गावठी दारू ची वाहतूक करणाऱ्या मारुती स्विप्ट कार सह सुमारे चार लाखाचा मुद्देमाल जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई
डिकी मधुन बेकायदा बिगरपरवाना टायरचे २ ट्युबमधून गावठी हातभट्टी दारू

गावठी दारू ची वाहतूक करणाऱ्या मारुती स्विप्ट कार सह सुमारे चार लाखाचा मुद्देमाल जप्त : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई
डिकी मधुन बेकायदा बिगरपरवाना टायरचे २ ट्युबमधून गावठी हातभट्टी दारू
बारामती वार्तापत्र
दौंड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या बातमीनुसार बाळासाहेब अशोक दळवी (वय ३७ वर्षे रा.मलटण ता.दौंड ) हा त्याचे त्याचे ताब्यातील मारुती स्विप्ट कार नं. एमएच ४२ के ६५८८ चे डिकी मधुन बेकायदा बिगरपरवाना टायरचे २ ट्युबमधून गावठी हातभट्टी दारू कि.रु. ६,०००/- स्विप्ट कार कार सह एकूण किं. ४,०६,०००/- (चार लाख सहा हजार) असा ऐवज वाहतुक करीत असताना मिळून आलेला आहे.
सदर आरोपी व ताब्यात घेण्यात आलेला मुद्देमाल हा दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला आहे. आरोपी विरूध्द मुंबई ॲक्ट कलम ६५(ई) प्रमाणे कारवाई केलेली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभाग अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे, पोलीस हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरु गायकवाड, पोलीस नाईक अभिजीत एकशिंगे, पोलीस कॉन्स्टेबल दगडू विरकर यांनी केली.