स्थानिक

गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची मानवताविषयक मूल्ये जगाला प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. भरत शिंदे

आवाहनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ब-याच विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.

गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची मानवताविषयक मूल्ये जगाला प्रेरणादायी – प्राचार्य डॉ. भरत शिंदे

आवाहनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ब-याच विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.

बारामती वार्तापत्र

गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांची साहित्य, संस्कृती आणि मानवतेची शाश्वत मूल्ये ही जगाला शांतीचा मार्ग दाखवतात म्हणूनच त्यांचे विचार हे आजच्या घडीला प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी केले. विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने नुकतीच गुरुदेव रविन्द्रनाथ टागोर यांची जयंती साजरी करण्यात आली.

त्यानिमित्ताने महाविद्यालयातील इंग्रजी विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्राचार्य डॉ शिंदे बोलत होते. 21 व्या शतकातील युवा पिढीला टागोर यांच्याविषयी काय वाटते हे जाणून घेण्यासाठी इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय खिलारे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना टागोरांच्या साहित्य आणि तत्त्वज्ञान या विषयावर आपले विचार मांडण्याचे आवाहन केले होते.

त्यांच्या आवाहनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन ब-याच विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. यामध्ये  सतीश नारनवर, प्रिया जगताप, मयूर कटके, कावेरी कालेल, संजीवनी रुपनार, आर्यन झोरे,  ज्योती तुगावे, पूजा काळे, प्रतीक्षा चव्हाण, तुषार शिंगटे, श्रेया बंडगर, सूरज चव्हाण आणि नेहा पाटील या विद्यार्थ्यांनी  टागोरांचे जीवन चरित्र आणि साहित्य यावर आपले विचार मांडले.

विद्यार्थ्यांबरोबरच इंग्रजी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. संजय खिलारे यांनी गुरुदेव रविन्द्रनाथ टागोर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा ऊहापोह करून टागोर, संत कबीर आणि संत तुकाराम यांच्या साहित्यकृतीतील मानवतावाद कसा मानवी मूल्ये अधोरेखित करतो याविषयी सुंदर विवेचन केले. तसेच प्रा. राजकुमार कदम यांनी आपल्या प्रास्ताविकात टागोर यांच्या कवितेचे मराठीतील भाषांतर सादर करून टागोर हे विश्वकवी असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रा. नूपुर डोईफोडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भाग्यश्री कुलकर्णी यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. दादासाहेब मगर यांनी केले.इंग्रजी विभागाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात एकूण 120 विद्यार्थी सहभागी झाले होते.

या विद्यार्थीभिमुख कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल उपप्राचार्य डॉ. शामराव घाडगे व डॉ.लालासाहेब काशिद
यांनी कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram