इंदापूर

गुलाब नगर (रेडा) येथून श्री संत गुलाब बाबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान

कोरोणा प्रादुर्भावामुळे हा पालखी प्रस्थान सोहळा साध्या पद्धतीने

गुलाब नगर (रेडा) येथून श्री संत गुलाब बाबा पालखी सोहळ्याचे प्रस्थान

कोरोणा प्रादुर्भावामुळे हा पालखी प्रस्थान सोहळा साध्या पद्धतीने

प्रतिनिधी ; निलेश भोंग

इंदापूर तालुक्यातील गुलाबनगर ( रेडा) गावातील महाराष्ट्रसह अनेकांचे श्रद्धास्थान असलेले संत गुलाबबाबा पालखी सोहळा निघत असतो.(दि.१४ )रोजी सालाबादप्रमाणे विधिवत पूजा करून पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान झाला. यावेळी संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष अँड. तानाजीराव देवकर, पत्रकार कैलास पवार बोलताना म्हणाले की ,संत गुलाबबाबा पालखी सोहळ्याचे पालखी सोळावे (१६)वर्षे असून कोरोनाच्या पादुर्भावामुळे हा पालखी सोहळा साध्या पद्धतीने याहीवर्षी प्रस्थान करत असून संत गुलाबबाबा मंदिरामध्ये पालखी सोहळा पाच दिवस मुक्काम करणार असून रोजच्यारोज प्रवचन ,भजन मोजक्या वारकरी मंडळीच्या उपस्थितीत होणार असून विविवत पूजा होणार आहे.

आषाढी एकादशी दिवशी संत गुलाबबाबा यांच्या पादुका नीरा नरसिंहपूर संगमावरती चंद्रभागेचा जिथून उगम झाला तिथे स्नान करून परत मंदिरामध्ये आणल्या जातील आणि गोपाळकाल्याचे किर्तन झाल्यानंतर पालखी सोहळ्याची सांगता होईल असे पालखीसोहळ्या बाबत माहिती देताना सांगितले .

यावेळी रेडा गावच्या सरपंच सौ.सुनिता देवकर बोलताना म्हणाल्या की, आज संत गुलाबबाबा पालखी सोहळा प्रस्थान होत आहे. आजच संतराज पालखी सोहळा गुलाबनगर (रेडा) गावात आगमन होत असते. दोन्ही पालखी सोहळ्याच्या वारकरी मंडळीने गुलाबनगर (रेडा) गजबजून जाते. प्रत्येक जण आपापल्या घरी वारकरी भोजनासाठी घेऊन जात असतो .आपापल्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करत असतो. पण कोरोनामुळे हा आनंद गेली दोन वर्षे घेता येत नाही त्याची भाविकांना खंत वाटते.

आम्ही वर्षभर संत गुलाबबाबा पालखी सोहळा व संतराज पालखी सोहळ्याची वाट पाहत असतो .घरापुढे रांगोळ्या काढून, घरामध्ये सजावट करून वारकऱ्यांना भोजन सेवा, रिंगण असा सांप्रदायिक कार्यक्रमची वाट पाहत असतो .पण कोरोनामुळे आनंद आज आम्हाला लुटता येत नाही तरी ही साध्या पद्धतीने का होईना हा सोहळा संपन्न झाला याचा आनंद आहे. यावेळी पालखी सोहळ्याचे मानाचे अश्‍व सराफवाडी येथील भागवत धायगुडे, चोपदार ,विणकरी, तुळशी वृंदावनचे मानकरी उपस्थित होते. कोरोणाचे जगावर मोठे संकट ओढवले आहे आणि त्यामुळे गेली दोन वर्षे पंढरपूर येथे वारी किंवा पालखी सोहळा शासनाच्या निर्बंधांमुळे होत नाही. मानाच्या मोजक्याच पालख्यांना शासनाने मान्यता दिल्यामुळे इतर पालखी सोहळे व दिंड्या आपापल्या गावातच साध्या पद्धतीने पालखी प्रस्थान करून विधिवत पूजा करत आहेत असे पहावयास मिळत आहे.

संत गुलाबबाबा कर्मभूमी काटेल धाम व जन्मभूमी टाकरखेड मोरे येथून काटेल धाम संस्थान अध्यक्ष सोनूमामा भाटिया, सचिव डॉ. पुरुषोत्तम दातकर सर्व विश्वस्त मंडळ, आणि टाकरखेड येथील संत गुलाबबाबाचे वंशज ज्ञानेश्वरभाऊ उमक, गोपाल उमक सर्व विश्वस्त मंडळ , पुणे, सोलापुर, नंदुबार, नागपुर, सागर(म.प्र), रायपुर, औरगांबाद, मुंबई, अलिबाग येथील भक्तांनी दूरध्वनीवरून पालखीसोहळ्यास शुभेच्छा दिल्या.

संत गुलाबबाबांचे भक्त हे महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक राज्यातून आणि जिल्ह्यातून इंदापूर तालुक्यातील संत गुलाबबाबा पालखी सोहळ्यास येत असतात. उद्योजक ,व्यावसायिक, व्यापारी यांचीही मोठी उपस्थित असते. या कार्यक्रमासाठी निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक, संत गुलाबबाबा संस्थानचे अध्यक्ष अँड.तानाजीराव बाबुराव देवकर, सरपंच सौ. सुनीता देवकर , सचिव तुकाराम जगदाळे ,माजी सरपंच तुकाराम देवकर नानासाहेब देवकर, अँड .योगेश देवकर, संतोष देवकर , शेटफळ हवेलीचे संत गुलाबबाबा भक्त मंडळ , रत्नदिप शिंदे ,उमेश पाटील,दिलीप देवकर, आदिनाथ देवकर ,बापु शिंदे, किसन देवकर, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पवार,धनंजय गायकवाड, हरीचंद्र देवकर ,चोपदार ज्ञानदेव गोळे, बाळासाहेब कुंभार ,गणपत शिंदे ,अशोक मोहिते महाराज ,बापु गुरव, गणपत जाधव ,जनार्दन गोसावी, ज्ञानदेव पवार, काशिनाथ देवकर, रेडा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी गणेश खारमाटे, कर्मचारी गणेश वाघ, महिला मंडळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!