गोपीचंद पडळकर यांची भ्रष्टाचाराची फाईल देण्यास नकार: हेमंत पाटील
सूर्यावर थुकंण्याचा प्रयत्न करु नये
गोपीचंद पडळकर यांची भ्रष्टाचाराची फाईल देण्यास नकार: हेमंत पाटील
सूर्यावर थुकंण्याचा प्रयत्न करु नये
बारामती वार्तापत्र
गोपीचंद पडळकर जेव्हा पासुन भाजपाचे आमदार म्हणून निवडुन आले तेव्हा पासुन त्यांनी कोरोना काळात जो आमदार फंडातुन खर्च केला तो बोगस खर्च देण्यास सांगली अधिकारी माहितीच्या अधिकारात देण्यास नकार देत असल्याचे इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सांगितले आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी काही महिन्यापुर्वी केली होती.पण गोपीचंद पडळकर यांनी कोरोना निधी स्वत: खाल्ला असुन गोरगरीब जनतेसाठी जो निधी कोरोना काळात वापरला जातो त्यात त्यांनी कित्येक करोडोंचा भ्रष्टाचार केला असुन हिमत असेल तर त्यांनी माझ्या प्रशनांची उत्तरे द्यावीत,असे हेमंत पाटील म्हणाले.
मोठमोठी वक्तव्य करून मोठे होण्याच्या नादात ते अडचणीत सापडले असून माझे सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना विनंती की, आपण मला मी जी माहीती मागवली आहे ती त्वरीत द्यावी अन्यथा मला आपल्या विरोधात अंदोलन करावे लागेल असे हेमंत पाटील म्हणाले. गोपीचंद पडळकर हे आमदार फंडाच्या जोरावर महाराष्ट्राचा दौरा करत असुन त्यांनी त्यांचा व्यवसाय जनतेला जाहीर करावा त्याच्यावर सांगली पोलीसांनी चोरी व खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्यांनी सूर्यावर थुकंण्याचा प्रयत्न करु नये असे हेमंत पाटील म्हणाले.