गोल्डन डि. एड्.बॅचने धाईंजे परिवारास केली आर्थिक मदत
कुटुंबाला आधार आणि भविष्याची तरतूद म्हणून केली मदत
गोल्डन डि. एड्.बॅचने धाईंजे परिवारास केली आर्थिक मदत
कुटुंबाला आधार आणि भविष्याची तरतूद म्हणून केली मदत
इंदापूर : प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.१ इंदापूरचे मुख्याध्यापक प्रविण धाईंजे (वय ४३) यांचे १० फेब्रुवारी रोजी लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले.त्यामुळे गोल्डन डी.एड् बॅचने धाईंजे यांच्या मूळगावी काटी ता.इंदापूर येथे जाऊन परिवाराचे सांत्वन केले.व कुटुंबाला आधार देत भविष्याची तरतूद म्हणून मदत केली.
१९९५ ते १९९७ या काळात महात्मा गांधी अध्यापक विद्यालय अरनेश्वर पुणे येथे त्यांनी डि.एड्.चे शिक्षण घेतले होते.डि.एड्.१९९५-९७ च्या विद्यार्थ्यांचा गोल्डन बॅच म्हणून व्हाट्सएपचा गृप कार्यरत आहे. या गृपच्या माध्यमातून १ लाख ३५ हजार रूपये किंमतीचा धनादेश गटविकास अधिकारी विजयकुमार परिट आणि गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांच्या हस्ते देण्यात आली.