गौरी गणपती सणानिमित्त स्वीट होमच्या दुकानांना ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी गणपती सणानिमित्त स्वीट होमची दुकाने सज्ज

गौरी गणपती सणानिमित्त स्वीट होमच्या दुकानांना ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.
गौरी गणपती सणानिमित्त स्वीट होमची दुकाने सज्ज..
बारामती वार्तापत्र
कोरोनाच्या महामारीमुळे गेले दोन वर्षापासून शांत असलेली मिठाईची दुकाने गौरी-गणपती सणानिमित्त सज्ज झाली आहे. दोन दिवसांपासून स्वीट होम च्या दुकानांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे दुकानदारांकडून सांगण्यात सांगण्यात आले.
महालक्ष्मी च्या पुढे मांडण्यात येणारी खेळणी व विविध प्रकारचे पदार्थ फळे याचीही आरस सुंदर पद्धतीत मांडणी करत केली जाते. याचा आस्वादही येणाऱ्या हळदी कुंकवाला आग्रहाने एकमेकींना बोलावलेल्या महिला वर्गांना दिला जातो. गौरी गणपती निमित्त शहरासह ग्रामीण भागात या सणाचे मोठे उत्साहाचे वातावरण आज पाहायला मिळाले. दरम्यान यावेळी मिठाईवाले यांना
समाधानकारक प्रतिसाद मिळत असल्याचे देखील सांगण्यात आले.
महिला वर्ग आजच्या दिवशी हळदी कुंकु व भेटीचा कार्यक्रमासाठी एकत्र येत असतात. मोठ्या आनंदात ते गौरी गणपती चे डेकोरेशन आणि नेवैद्य म्हणून फळे, व विविध प्रकरची मिठाई ठेवत असतात. यासाठी आज मात्र बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर मधील सोमेश्वर स्वीट होम चे मालक महेश सत्यगिरी यांनी ग्राहकांसाठी आपली परंपरा नेहमीकच जपत असून त्यांनी ग्राहकांचे शुभेच्छा देत आभार मानले .