ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयात करा करियर ! (पदवी- पदव्युत्तर नंतर उत्कृष्ठ करिअरची संधी)
- डॉ. अमर कृष्णाजी कुलकर्णी ग्रंथपाल, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय

ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विषयात करा करियर ! (पदवी- पदव्युत्तर नंतर उत्कृष्ठ करिअरची संधी)
– डॉ. अमर कृष्णाजी कुलकर्णी ग्रंथपाल, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय
बारामती वार्तापत्र
आजच्या माहिती तंत्रज्ञ युगात वाढलेल्या स्पर्धेमध्ये चांगला पगार आणि करिअरची संधी ‘ग्रंथालय आणि माहितीशास्त्र’
विषयातील करिअर उपलब्ध करून देतो आहे. पदवी वा पदव्युत्तर नंतर काय करायचे असे प्रश्न अनेकदा पडतात. आजच्या
कृत्रिम बुद्धीमत्ता अर्थात एआय च्या युगात चाट-जीपिटी सारखे अनेक टूल उपलब्ध असले तरी माहितीचे व्यवस्थापन
आणि त्याचे वर्गीकरण करणेकरिता मानवी बुद्धिमत्तेला पर्याय नाही आणि माहितीचे वर्गीकरण, संस्करण आदीबाबतचे
प्रशिक्षण ‘ग्रंथालय आणि माहितीशास्त्र’ अभ्यासक्रमातून प्राप्त करता येते.
पदवीनंतर एक वर्ष कालावधीचा बॅचलर इन लायब्ररी अँड इन्फोर्मेशन सायन्स (बिलिब आयएससी) व त्यांनतर मास्टर
इन लायब्ररी अँड इन्फोर्मेशन सायन्स (एमलिब आयएससी) हे दोन अभ्यासक्रम पदवीनंतर करता येतात. एमलिब नंतर
सेट/ नेट व पीएचडी पर्यंतहि अभ्यास करता येतो. अभ्यासक्रमानंतर नोकरीच्या संधी कुठे ?
1. शालेय / महाविद्यालयीन ग्रंथपाल – : बिलिब , एमलिब कोर्स नंतर अनेक शाळा – महाविद्यालयात ग्रंथपाल
म्हणून नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत . यामध्ये केवळ ग्रंथपाल म्हणून नाही तर ग्रंथालयीन सहाय्यक , सह्यक
ग्रंथपाल
2. माहिती व्यवस्थापन अधिकारी – संगणकाचे व सॉफ्टवेअर याचे ज्ञान उत्तम याची जोड असेल तर अनेक खाजगी
कंपन्या सॉफ्टवेअर, हार्डवेअर तसेच इतरही कंपनी मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध असतात
3. सरकारी कार्यालये / मंत्रालये – महाराष्ट्र सरकार तसेच केंद्रीय खात्याच्या अनेकविध क्षेत्रात नोकरीच्या संधी
उपलब्ध आहेत जसे कि राष्ट्रीय ग्रंथालये, सरकारी ग्रंथालय, मंत्रालय, संसद व विधिमंडळ ग्रंथालय, भारतीय
रिजर्व बैंक, जिल्हा ग्रंथालय ई.
4. खाजगी कंपनी, म्युझियम इ. – वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेकविध खाजगी क्षेत्रात संधी उपलब्ध
आहेत.
याव्य्तारिक्त बँक, वित्तीय संस्था व पब्लिक सेक्टर कार्यालयात संधी उपलब्ध आहेत.वगवेगळ्या क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. मराठी , इंग्रजी , हिंदी या भाषांवर प्रभुत्व असेल आणि त्याबरोबर इतर भाषेचे जसे कि जर्मन, जपान, फ्रेंच यापैकी कोणत्याही एका भाषांची जोड दिल्यास परदेशातही अनेकविध करियरच्या संधी मोठ्याप्रमाणावर उपलब्ध आहेत.
माहिती विश्लेषक (Information Analyst), ज्ञान व्यवस्थापक (Knowledge Manager), डिजिटल क्युरेटर, अभिलेखागारपाल (Archivist) किंवा माहिती सल्लागार (Information Consultant) अशा विविध उच्च-स्तरीय पदांवर काम करू शकता.
कॉर्पोरेट कंपन्या, संशोधन संस्था, सरकारी विभाग आणि शैक्षणिक संस्थांमध्ये उत्तम संधी उपलब्ध आहेत. अभ्यासक्रम कुठे करता येईल ?
सावित्रिबाई फुले पुणे विद्यापिठाअंतर्गत पुणे विद्यापीठाबरोबरच केवळ दोन ठिकाणी हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे यापैकी तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात लायब्ररी अँड इन्फोर्मेशन सायन्स विभागाद्वारे दोनही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.बिलिब व एमलिब अभ्यासक्रमाकरिता मर्यादित जागा उपलब्ध आहेत.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात दोनही कोर्स उपलब्ध असून १९९0 पासून अनेक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाच्या
माध्यमातून विविध क्षेत्रात नोकरीच्या संधी मिळालेल्या आहेत अभ्यासक्रमात काय शिकाल ?
बिलिब अभ्यासक्रमांतर्गत थेअरी व प्रात्यक्षिक अशा स्वरुपात ग्रंथालय कार्यापद्धती बेसिक , ज्ञान वर्गीकरण, तालीकीकरण, माहिती व्यवस्थापन आणि संस्करण यासह संगणकीय प्रणाली बेसिक याचा समावेश आहे. अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत उपलब्ध असून दोन सत्रांमध्ये आहे. याचप्रमाणे मास्टर्स डिग्रीमध्ये माहिती संप्रेषण आणि समाज, माहिती पुनर्प्राप्ती, संशोधन पद्धती व बिब्लिओमॅट्रिक्स, ई-पब्लिशिंग व प्रोजेक्ट वर्क तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘कोहा’ संगणकीय आज्ञावलीचे प्रात्यक्षिक अशी रचना आहे .
डिजिटल सजत्ता: या अभ्यासक्रमामध्ये डिजिटल लायब्ररी व्यवस्थापन, ई-संसाधनांचा वापर, डेटाबेस प्रणाली आणि नवीन माहिती तंत्रज्ञान याचा देखील काळानुरूप समावेश केलेला असून माहितीचे डिजिटल स्वरूपात व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आत्मसात करता येतील .
विश्लेषणात्मक कौशल्ये आणि माहितीचे सखोल विश्लेषण करणे, संशोधन पद्धती वापरणे आणि गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय शोधणे
यामुळे कोणत्याही संस्थेला धोरणात्मक निर्णय घेण्यात मदत होते आणि हीच तंत्रे अभ्यासक्रमामध्ये शिकता येतील मर्यादित प्रवेश असल्याने प्रवेशाकरिता व अधिकमाहितीकरिता विध्यार्थ्यानी लायब्ररी अँड इन्फोर्मेशन सायन्स विभागात संपर्क साधणे आवश्यक आहे. संपर्काकरिता भ्रमणदूरध्वनी ९७६३०२०२४७ / ९०९६५५७८५१