ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अवैध शस्त्र साठा जप्त
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान अवैध शस्त्र साठा जप्त
बारामती वार्तापत्र
राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना पुणे जिल्हा ग्रामीण पोलिसांनी मध्यरात्री पुणे जिल्हा ग्रामीण च्या उपविभाग निहाय कोम्बिंग ऑपरेशन करत आरोपींना अटक करून व त्यांच्याकडून अवैद्य शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
संपूर्ण पुणे जिल्ह्यातून 7 उपविभागातून 79 पथके तयार केली. यामध्ये 72 अधिकारी व 377 पोलीस तैनात केले होते. या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील अग्निशस्त्र बाळगणारे 158 सराईत गुन्हेगार चेक केले असता त्यामधून उरळी कांचन येथील सोमनाथ बाळासाहेब कांचन वय 34 याच्याकडून एक गावठी पिस्टल व जिवंत काडतूस असा एक लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
भोर येथील आदर्श चंद्रकांत सांगळे वय 28 याच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल दोन जिवंत काढतुस असा पस्तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
शिरूर येथील हर्षल मनोहर काळे वय 21 त्याच्याकडून दोन लोखंडी तलवारी पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वडगाव मावळ पोलीस स्टेशन अंतर्गत रोहित संजय आंद्रे वय 20 वरून अमोल वहिले वय 19 वडगाव तालुका मावळ यांच्या ताब्यातून एक गावठी पिस्तूल दोन जिवंत काढतुस असा एकूण 40 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कामशेत पोलीस स्टेशन अंतर्गत रुपेश विजय लालगुडे प्रतीक अर्जुन निळकंठ यांच्याकडून एक गावठी पिस्तूल दोन जिवंत काडतुसे व एक स्कूटर असा 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
असे एकूण अकरा आरोपींच्या ताब्यातून चार गावठी पिस्टल सहा जिवंत काडतुसे व सहा तलवारी व कोयता जप्त करण्यात आला आहे.
तसेच रेकॉर्डवरील हवे असलेले 352 आरोपी चेक केले असता त्यातील 39 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हिस्ट्रीशीटर 52 व मालमत्तेच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील 98 सराईत आरोपींना चेक करण्यात आले आहे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 अन्वये दहा केसेस, तीन तडीपार इसमांनी प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रात पुन्हा प्रवेश केल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 142 अन्वये कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तसेच निवडणुकीच्या काळात परवानगीपेक्षा जास्त वेळ चालू ठेवलेल्या 38 हॉटेलवर कायदेशीर कारवाई करण्यात आले आहे. दारूबंदी कायद्यान्वये अवैधरित्या दारू विक्री करणार्यावर रांजणगाव पोलीस स्टेशन कडून एकवीस हजार 36 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाहने ,हॉटेल ,ढाबे ,लॉज ,एटीएम, पेट्रोल पंप, गुन्हेगारांचे आश्रयस्थान पोलिसांनी या ऑपरेशन दरम्यान तपासले आहेत व भविष्यातही अशा प्रकारची कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी सांगितले.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांचे आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक पुणे विवेक पाटील व अपर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण पोलिसांनी केली.