आपला जिल्हा

ग्रामपंचायत बिनविरोध करा २१ ते ३१ लाखाचा निधी मिळवा;आमदार यशवंत माने यांची घोषणा

बिनविरोध निवडणूक अभियानाला प्रतिसाद देण्याचे केले आवाहन

ग्रामपंचायत बिनविरोध करा २१ ते ३१ लाखाचा निधी मिळवा;आमदार यशवंत माने यांची घोषणा

बिनविरोध निवडणूक अभियानाला प्रतिसाद देण्याचे केले आवाहन

इंदापूर-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )

ग्रामपंचायत निवडणूकीच्या काळात गावकीतील – भावकीतील घराघरात होणारे वाद-विवाद टाळण्यासाठी व गावामध्ये शांतता एकोपा निर्माण व्हावा म्हणून माजी आमदार राजन पाटील व जेष्ठ नेते बळीराम काका साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ विधानसभा मतदारसंघातील ज्या – ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकी लागल्या आहेत. त्या ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात. ज्या ग्रामपंचायतची १ ते ९ सदस्य संख्या आहे अशा ग्रामपंचायतींना २१ लाखांचा तर ११ ते १७ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीना ३१ लाखांचा शासनाच्या विविध योजनेअंतर्गत बक्षीस रुपी निधी वर्षभरात देण्याची घोषणा आमदार यशवंत माने यांनी केली आहे.

ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक अभियाना अंतर्गत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील ज्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या ग्रामपंचायतीतील नागरिकांनी गावाच्या सर्वांगीण विकास गटतट बाजूला ठेवून एकत्रित येवून ग्रामपंचायत बिनविरोध निवडणूक अभियान प्रकियामध्ये जास्त जास्त ग्रामपंचायतीने सहभागी होऊन लोकशाही समृद्ध करण्यासाठी शांतताप्रिय मार्गाने हातभार लावावा असे देखील आवाहन आमदार यशवंत माने यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button