स्थानिक

सोमेश्वर ने ऊस दराची कोंडी फोडली : जिल्ह्यात सर्वाधिक दर

सद्या तरी जिल्ह्यात सर्वात अधिक दर जाहीर करणारा एकमेव सोमेश्वर कारखाना ठरला आहे. 

सोमेश्वर ने ऊस दराची कोंडी फोडली : जिल्ह्यात सर्वाधिक दर

सद्या तरी जिल्ह्यात सर्वात अधिक दर जाहीर करणारा एकमेव सोमेश्वर कारखाना ठरला आहे.

बारामती वार्तापत्र

बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचा मागील सन २०२०-२१ या हंगामात तुटून आलेल्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये दर देण्यात येणार आहे.

याबाबत आज संचालक मंडळाच्या पार पडलेल्या मासिक सभेत यावर शिक्का मोर्तब करण्यात आले. यापूर्वी सोमेश्वर कारखान्याने सभासदांना प्रतिटन २८०८ रुपये एफआरपी अदा केली आहे. ३१०० रुपये दर जाहीर केल्याने आता सभासदांना २९२ रुपये अधिकचे मिळणार आहेत. त्यामुळे सोमेश्वर कारखाना दिवाळीला किती बिल काढणार याकडे सर्व सभासदांच्या नजरा लागल्या होत्या. त्याला आता पूर्ण विराम मिळाला आहे.

सोमेश्वर ची जिल्ह्यात सरशी

जिल्ह्यात सोमेश्वर कारखान्याने आज मागील वर्षीच्या तुटून गेलेल्या उसाला प्रतिटन ३१०० रुपये दर जाहीर केला आहे. सद्या तरी जिल्ह्यात सर्वात अधिक दर जाहीर करणारा एकमेव सोमेश्वर कारखाना ठरला आहे.

Back to top button