ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बिगुल वाजले;21 जागांसाठी 299 उमेदवारांनी अर्ज दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार या विद्यमान संचालकांसह अन्य सर्व विद्यमान संचालक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बिगुल वाजले;21 जागांसाठी 299 उमेदवारांनी अर्ज दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार या विद्यमान संचालकांसह अन्य सर्व विद्यमान संचालक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
प्रतिनिधी
ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे बिगुल वाजले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळांच्या 21जागांसाठी 299 उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
एवढ्या जागांसाठी होणार निवडणूक
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. आठ मतदार संघातील तब्बल 5 हजार 166 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. बँकेच्या 21 जागांसाठी 299 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सोसायटी अ वर्ग गटासह यावेळी अन्य सर्व गटांमध्ये चुरस आहे. भाजपच्या वतीने बहुतेक सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेस समोर सध्या तरी आव्हान उभे केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या विद्यमान संचालकांसह अन्य सर्व विद्यमान संचालक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
असा असेल निवडणूक कार्यक्रम
– उमेदवारी अर्ज मागे घेणे : 8 डिसेंबर ते 22 डिसेंबर
– जिल्हा बँकेसाठी मतदान : 2 जानेवारी 2022
– मतमोजणी : 4 जानेवारी 2022
बँकेचे संचालक मंडळ : 21
– अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) : 13
– ब मतदार संघ : 1
– क मतदार संघ : 1
– ड मतदार संघ : 1
– अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : 1
– इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : 1
– विभक्त जाती व प्रजाती : 1
– महिला प्रतिनिधी : 2