मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक!
राजेश पांडेने मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोव्हिडची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण आयोजित केल्याचा आरोप आहे. सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र नागरिकांना देऊन फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे

मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक!
राजेश पांडेने मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोव्हिडची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण आयोजित केल्याचा आरोप आहे. सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र नागरिकांना देऊन फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे.
बारामती वार्तापत्र
मुंबईतल्या उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये बोगस लसीकरणाचे बारामती कनेक्शन उघड झाले आहे. बोगस लसीकरण प्रकरणात बारामतीतून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी यापूर्वीच आठ आरोपींना अटक केली आहे.
बारामतीतील भिगवण रोडवरील अमृता लॉज मधून आरोपी राजेश पांडे उर्फ राजेश दयाशंकर पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे.
राजेश पांडे याने मुंबईत कोविडची लस असल्याचे भासवून भेसळयुक्त द्रव्य नागरिकांना दिले होते. वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलची प्रमाणपत्रे नागरिकांना देऊन नागरिकांची फसवणूक केली होती. ३० मे २०२१ या दिवशी कांदिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत प्रत्येकी बाराशे ६० रुपये घेऊन राजेश पांडे याने कोरोना ची लस लोकांना दिली होती.
बारामतीतून आरोपीला बेड्या
राजेश पांडेने मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोव्हिडची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण आयोजित केल्याचा आरोप आहे. सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे प्रमाणपत्र नागरिकांना देऊन फसवणूक केल्याचंही समोर आलं आहे. आरोपी राजेश पांडे याला बारामतीतील भिगवण रोडवरील अमृता लॉजवरुन पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीला अटक करण्यात आल्यावर मुंबईतील कांदिवली पोलिसांची टीम आरोपीला ताब्यात घेण्यासाठी बारामतीकडे रवाना झाली आहे. लवकरच आरोपीला मुंबईत आणले जाणार आहे.
काय आहे प्रकरण?
30 मे 2021 रोजी कांदिवलीतील एका उच्चभ्रू सोसायटीत लसीकरण करण्यात आले होते. सोसायटीमधील 390 सदस्यांकडून प्रत्येकी 1260 रुपये घेत कोव्हिड प्रतिबंधक लस देण्यात आली होती. लसीकरणानंतर सोसायटीतील नागरिकांनी प्रमाणपत्राची मागणी केली असता लसीकरण आयोजकांनी लस घेतलेल्या सदस्यांची माहिती घेतली. त्यानंतर या सदस्यांना विविध रुग्णालय आणि कोव्हिड सेंटरमध्ये लस घेतल्याचे प्रमाणपत्र दिले.
या प्रकरणी कांदिवली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी एकूण 8 आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून नागरिकांची फसवणूक केलेली 12,40,000 रुपये सुद्धा जप्त करण्यात आले आहेत.