ग्राहकांच्या वीज बिल माफी संदर्भात वीज बिलांची होळी करत भाजपचे बारामती महावितरण कार्यालया समोर आंदोलन
महाविकास आघाडी सरकारचा नोंदवला निषेध
ग्राहकांच्या वीज बिल माफी संदर्भात वीज बिलांची होळी करत भाजपचे बारामती महावितरण कार्यालया समोर आंदोलन
महाविकास आघाडी सरकारचा नोंदवला निषेध
बारामती वार्तापत्र
भाजप जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज दि.२३ रोजी ग्राहकांच्या वीज बिल माफी संदर्भात वीज बिलांची होळी करत बारामती महावितरण कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले.यावेळी महाविकास आघाडी सरकारचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला.
महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात वीज बिल ग्राहकांचे बिल माफ करू,ग्राहकांच्या वीज बिल युनिट मध्ये सवलत देऊ, वाढीव बिले देणार नाही, जळालेले विद्युत रोहित्र हे ताबडतोब बसून देऊ अशा घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मंत्र्यांनी त्यावेळी केल्या होत्या, परंतु अद्यापि वीजबिल माफ न झाल्याने सरकारने शेतकरी व ग्राहकांची फसवणूक केली असल्याचा आरोप करत सरकारने महाराष्ट्रातील सर्वांची होणारी सक्तीची वीजबील वसूली थांबवावी, वीजबील माफ करावे अशी मागणी करत याबाबतचे निवेदन महावितरणचे कार्यकारी अभियंता लटपटे यांच्याकडे देऊन वीज बिल माफ न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ही यावेळी देण्यात आला.
या प्रसंगी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे, बारामती भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, माळेगाव स.सा. का.संचालक जी बी आण्णा गावडे, भाजपचे पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य गोविंद देवकाते,भाजपच्या किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष धनंजय गवारे, युवा नेते युवराज तावरे,भाजयुमोचे शहराध्यक्ष सचिन मलगुंडे ,भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया सहसंयोजक अक्षय गायकवाड, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष अंजलीताई,खजिनदार सुरेंद्र जेवरे, शहाजी कदम, भारत देवकाते,पिंकीताई मोरे, सारिका लोंढे,संदीप अभंग, नितीन शेळके,बापू फणसे,विनोद खोमणे,सुधाकर पांढरे,महेश नेटके,अभिलाश पोटे,संजय रायसोनी, ओंकार साठे, सचिन मोरे,नाना भापकर,निरंजन जवारे,शरद भगत आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.