स्थानिक

ग्राहकांना पारदर्शक सेवा मिळण्याच्यादृष्टीने व्यापक स्वरुपात जनजागृती करावी;उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर पंचायत समिती येथे राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

शासकीय सेवा जलदगतीने सुविधा प्रदान करण्यात येते.

ग्राहकांना पारदर्शक सेवा मिळण्याच्यादृष्टीने व्यापक स्वरुपात जनजागृती करावी;उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर
पंचायत समिती येथे राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न

शासकीय सेवा जलदगतीने सुविधा प्रदान करण्यात येते.

बारामती वार्तापत्र 

सद्याचे युग हे डिजिटल युग असून काळाची आव्हाने ओळखून ग्राहकांना विशेषतः तरुण पिढीला पारदर्शक सेवा मिळण्याकरीता ग्राहक परिषदेने व्यापकस्वरुपात जनजागृती करावी, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, बारामती वैभव नावडकर यांनी केले.

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालय आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायत बारामती तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह येथे आयोजित कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निवासी स्वीय सहाय्यक नितीन हाटे, अति.

महावितरणचे कार्यकारी अभियंता गणेश जमाले, तहसिलदार स्वप्नील रावडे, गटविकास अधिकारी किशोर माने, निवासी नायब तहसीलदार नामदेव काळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी तितिक्षा बारापात्रे, प्रादेशिक परिवहन निरीक्षक श्री. प्रीतम कदम, ग्राहक पंचायत सदस्य बारामती ॲड. किरण शिंदे, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष संजीव बोराटे, जागृत ग्राहक राजा पुणे जिल्हाध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य दिलीप निंबाळकर आदी उपस्थित होते.

श्री. नावडकर यांनी महसूल विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवा ऑनलाईन पद्धतीने मिळत असल्याने नागरिकांच्या वेळेत बचत होत आहे.

प्रत्येक गावात सेतू केंद्र, ई सेवा आदींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा जलदगतीने सुविधा प्रदान करण्यात येते. याकरिता ऑनलाईन सुविधांची प्रणालीद्वारे होणाऱ्या पावतीनुसारच ग्राहकांनी सेवा शुल्क अदा करावे.

शासकीय सेवांचा लाभ घेण्याकरिता विहीत शुल्कापेक्षा अधिक शुल्क अदा करण्याची आवश्यकता नाही तसेच विहित वेळेत सेवा न मिळाल्यास महाराष्ट्र सेवा हक्क कायद्याअंतर्गत संबंधित यंत्रणेकडे अपील करता येते, असेही श्री. नावडकर म्हणाले.

श्री. रावडे म्हणाले, समाजात ग्राहकाची फसवणूक होत असल्यास त्यांची व्यापक स्वरुपात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. नागरिकांची फसवणूक झाल्यास 1915 या हेल्पलाइन क्रमांक किंवा 8800001995 या चॅटबॉट किंवा e-jagriti.gov.in संकेतस्थळद्वारे तक्रार दाखल करता येते, अधिकाधिक नागरिकांनी या सेवांचा लाभ घ्यावा, ग्राहकांनी आपल्या हक्काबाबत जागरुक राहावे, असे आवाहन श्री. रावडे यांनी केले.

श्री. निंबाळकर म्हणाले, या वर्षीच्या राष्ट्रीय ग्राहक दिनाची संकल्पना ‘जलद, सुलभ डिजिटल न्यायाकडे वाटचाल’ अशी आहे.

ग्राहक व्यवहार विभागाच्यावतीने ग्राहकांचे हक्कांचे संरक्षण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जागो ग्राहक जागो ॲप, जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्ड चा लाभ घ्यावा. या उपयोजकांमुळे (ॲप्लिकेशन्स) ग्राहक व्यवहार विभागाला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील अनैच्छिक बाबी (डार्क पॅटर्न) शोधून काढण्यासाठी साधने आणि संसाधनांसह मदत होणार आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या तरतुदीविषयी श्री. निंबाळकर यांनी माहिती दिली.
श्री. जमाले यांनी विद्युत वितरणप्रणाली मध्ये झालेल्या विविध बदलांबाबत व सुविधांबाबत तसेच श्री.

हाटे यांनी विविध जनआरोग्य योजनांबाबत माहिती दिली. तसेच ॲड. शिंदे यांनी ग्राहकांनी वस्तू व सेवेचा लाभ घेतांना घ्यावयाची काळजी तसेच ग्राहक संरक्षण कायदा याबद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमानंतर मान्यवरांनी पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनास भेटी देत विविध विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सेवाबाबत माहिती घेतली.

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “फसवणूक नको ग्राहकाचे संरक्षण हवे”, उत्कर्ष माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय, वाघळवाडी च्या विद्यार्थ्यांनी “जागर जागृकतेचा, ग्राहकांच्या हक्काचा” तसेच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या ग.भि. देशपांडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी “मी ग्राहक, मी राजा” या पथनाट्याचे सादरीकरण केले.

यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, ग्राहक संरक्षण परिषद, जागरूक ग्राहक राजा सामाजिक संस्था (ग्राहक संघटना), ग्राहक पंचायत महाराष्ट्र तालुका बारामतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्राम विकास अधिकारी नीलम देशमुख तसेच पुरवठा निरीक्षण अधिकारी तितिक्षा बारापत्रे यांनी आभार प्रदर्शन केले.

Back to top button