ग्रीन काटी सोशल फौंडेशनच्या वतीने 100 देशी रोपांचे वृक्षारोपण.
विविध देशी झाडांचे केले वृक्षारोपण
ग्रीन काटी सोशल फौंडेशनच्या वतीने 100 देशी रोपांचे वृक्षारोपण.
विविध देशी झाडांचे केले वृक्षारोपण
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
काटी येथील ग्रीन काटी सोशल फौंडेशनच्या वतीने भरतवाडी येथील प्राथमिक शाळा, महादेव मंदिर व रस्त्याच्या दुतर्फा ट्री गार्ड सह वृक्षारोपण करण्यात आले.ग्रीन काटी सोशल फौंडेशनच्या वतीने मागील 5 वर्षांपासून दरवर्षी 100 देशी रोपांची ट्री गार्डसह लागवड केली जाते.लाडवड केलेल्या झाडांची जोपासना केली जाते.आतापर्यंत लागवड केलेली बहुसंख्य झाडे आज सावली देत आहेत व गावच्या सौंदर्यात भर टाकत आहेत.पर्यावरण संवर्धनाचे काम अतिशय मनापासून फौंडेशनच्या वतीने केले जात आहे.यावेळी काटी गावचे सुपुत्र ग्रीन काटी साठी सदैव मदतीला धावून येणारे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी वृक्षारोपण करून शुभेच्छा दिल्या. 80 वर्षाच्या भागूबाई मोहिते यांनीही स्वयंस्फूर्तीने वृक्षारोपण केले व संगोपनाची जबाबदारी घेतली. यावेळी फौंडेशनचे अध्यक्ष रणजित बोराटे, पर्यावरण प्रेमी सुनिल मोहिते,सेल टॅक्स अधिकारी नितीन गोरे,दीपक गुळवे,तानाजी भोंग,संतोष शेंडे,सतीश भोसले,तुकाराम मोहिते,उपशिक्षणाधिकारी अमोल मोहिते, अजय मोहिते,कनिफ भोंग,संतोष मोहिते,शरद पडसळकर, दिलीप मोहिते इत्यादी उपस्थित होते.शहा नर्सरी इंदापूर यांच्या वतीने मोफत रोपे दिल्याबद्दल फौंडेशन च्या वतीने आभार मानण्यात आले.