ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसलेंच्या अडचणी वाढणार? पुरस्कारासाठी खोटी माहिती दिली, जिल्हा परिषदेच्या सभेत गंभीर आरोप
पुरस्कारासाठी डिसलेंनी परितेवाडी हा आदिवासी भाग आहे.
ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसलेंच्या अडचणी वाढणार? पुरस्कारासाठी खोटी माहिती दिली, जिल्हा परिषदेच्या सभेत गंभीर आरोप
पुरस्कारासाठी डिसलेंनी परितेवाडी हा आदिवासी भाग आहे.
सोलापूर :प्रतिनिधी
ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांच्या अडचणी वाढत असल्याचं समोर येत आहे. ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसलेंवर आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या सभेत रणजितसिंह डिसले यांच्या विरोधात निषेधाचा सूर पाहायला मिळाला. जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जिल्हा परिषदेच्या सभेत रणजित डिसलेंविरोधात निषेधाचा सूर दिसून आला.
डिसले यांनी पुरस्कारासाठी परितेवाडी हा आदिवासी भाग आहे. लोक कन्नड भाषिक असून झेडपी शाळा गोठ्यात भरते. तसेच येथे 80 टक्के बालविवाह होतात, अशी खोटी माहिती पुरस्कारासाठी दिल्याचा आरोप झेड पी सदस्य भारत शिंदे यांनी केला.
या प्रकरणामुळं रणजितसिंह डिसले यांच्या अडचणी वाढणार असल्याचं दिसून येत आहे. तर, जिल्हा परिषदेच्या सभेत मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी आणि शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
दिलीप स्वामी आणि किरण लोहार यांच्या अभिनंदनाचा ठराव
जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सभेत शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि झेडपी सीईओ दिलीप स्वामी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
भारत शिंदे यांचे आरोप काय?
पुरस्कारासाठी डिसलेंनी परितेवाडी हा आदिवासी भाग आहे. लोक कन्नड भाषिक असून झेडपी शाळा गोठ्यात भरते. तसेच येथे 80 टक्के बालविवाह होतात, अशी खोटी माहिती पुरस्कारासाठी दिल्याचा आरोप झेडपी सदस्य भारत शिंदे यांनी केला. भारत शिंदे हे परितेवाडी भागातील जिल्हा परिषस सदस्य असून त्यांनी झेडपीच्या ऑनलाईन सभेत हा आरोप करत निषेध केला