स्थानिक
घंटागाडीची सुविधा असताना देखील माळेगाव खुर्द हद्दीत कचरा रस्त्यावर
सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरली असल्याने नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे

घंटागाडीची सुविधा असताना देखील माळेगाव खुर्द हद्दीत कचरा रस्त्यावर
सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरली असल्याने नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे
बारामती वार्तापत्र
कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडीची सुविधा असताना ग्रामस्थ जाणिव पुर्वक कचरा रस्त्यावर टाकत असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.
माळेगाव – माळेगाव खुर्दच्या हद्दीत चारी शेजारी काही ग्रामस्थ दुकानातील घरातील व हाँटेलमधील कचरा थेट रस्त्यावर टाकत आहेत. यामुळे या भागात घाणी सोबत दुर्गंधी पसरली आहे.माळेगाव खुर्द येथील ग्रामस्थ दैनंदिन कामासाठी माळेगावात येतात.तसेच पुण्याला जाताना जवळचा मार्ग म्हणून या रस्त्यावरून अनेक वहाने जातात.
सर्वत्र घाण व दुर्गंधी पसरली असल्याने नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.येथे कचरा टाकु नये अन्यथा कारवाई केली जाईल असा सुचना फलक लावुन देखील कचरा टाकला जात आहे.