घरात शिरले पावसाचे पाणी.
इंदापूर नागरी संघर्ष समिती ने मुख्याधिकारी यांना दिले निवेदन.
इंदापूर:- सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
दि.२९ जून च्या मध्यरात्री नंतर इंदापूर शहरात पावसाला सुरुवात झाली होती त्यामुळे काही भागात गटारी तुंबल्याने पावसाचे पाणी नागरीवस्तीत शिरले यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून सदरचा प्रसंग का ओढवला ? असा सवाल इंदापूर नागरी संघर्ष समितीने मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात उपस्थित केला आहे.
नगरपरिषदेने आपल्या यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हाताला काम नाही त्यातच गटारीच्या बाबतीत कमालीचे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्वसामान्यांवर हा प्रसंग ओढवला असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत इंदापूर नागरी संघर्ष समिती ने दिलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे.
या वेळी मा.उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे,अँड.नारायण ढावरे,गफूरभाई सय्यद,शिवाजीराव मखरे, हनुमंत कांबळे,माऊली नाचण,अंकुश काळे,चांद पठाण,नागेश कांबळे उपस्थित होते.