मुंबई

घर घेताय ! मग आता बिल्डर भरणार मुद्रांकशुल्क ,घरांच्या किमती होणार कमी

बांधकाम क्षेत्राला बळकटी आणण्यासाठी दीपक पारेख समितीची स्थापना करण्यात आली होती.

घर घेताय ! मग आता बिल्डर भरणार मुद्रांकशुल्क ,घरांच्या किमती होणार कमी

बांधकाम क्षेत्राला बळकटी आणण्यासाठी दीपक पारेख समितीची स्थापना करण्यात आली होती.

मुंबई : बारामती वार्तापत्र
महा विकास आघाडी सरकारने बांधकाम क्षेत्रासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियम वर 31 डिसेंबर 21 पर्यंत 50 टक्के सूट देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता घर स्वस्त होणार आहे.

मागील काही दिवसात बांधकाम क्षेत्रात कमालीची मंदी आली होती. त्यामुळे राज्यालाही आर्थिक फटका बसला होता. मात्र आता बांधकाम क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी व बळकटी आणण्यासाठी राज्य सरकारने हा प्रीमियम मध्ये 50 टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. जे बांधकाम व्यवसायिक / विकसक या सवलतीचा लाभ घेतील त्यांना ग्राहकाच्या वतीने मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकाला घर कमी किमतीत मिळणार आहे.

बांधकाम क्षेत्राला बळकटी आणण्यासाठी दीपक पारेख समितीची स्थापना करण्यात आली होती. बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक व परवडणाऱ्या घरांची उपलब्धता या करिता समितीने अनेक महत्त्वपूर्ण सूचना सरकारला केल्या होत्या. त्यामध्ये जो प्रीमियम आकारला जातो त्यावर 31 डिसेंबरपर्यंत 50 टक्‍के सूट देण्याचा तसेच इतर मूल्या बाबत सवलत देण्याच्या देखील सूचना सरकारला केल्या होत्या. त्याप्रमाणे सरकारने आज निर्णय घेतला.

बांधकाम व्यवसायिकांना वेगवेगळ्या कारणास्तव महापालिका किंवा नगर रचना विभागास शुल्क भरावे लागते. त्या शुल्कात आता पन्नास टक्के सवलत मिळणार असल्याने घराच्या किमती कमी होतील व घरांची मागणीही वाढेल असे मत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्ता तनपुरे यांनी मंत्री मंडळाच्या निर्णयावर व्यक्त केले. तर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की सरकारचा हा निर्णय केवळ विकसकांना डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला आहे.

एकंदरीतच या निर्णयामुळे विकसकांना जरी यातून सूट मिळणार असली तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम घरांच्या किमती कमी होण्यावर नक्कीच होणार आहे त्यामुळे सामान्य नागरिकाचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Back to top button