आपला जिल्हा

चंदन लपवले मात्र त्याचा सुगंध पोलिसांना आला

सव्वीस लाख रुपयाचे चंदन आरोपींकडून जप्त

चंदन लपवले मात्र त्याचा सुगंध पोलिसांना आला

सव्वीस लाख रुपयाचे चंदन आरोपींकडून जप्त

बारामती वार्तापत्र
चोरीच्या नव नवीन क्लुप्त्या दिवसेंदिवस आपल्या ऐकीवात असतात मात्र चोरी करून मुद्देमाल लपविण्यासाठी एका टेम्पोत अलिबाबाची गुहा तयार करून आरोपीने सव्वीस लाख रुपयाचे चंदन लपवुन पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसही गुन्हेगारांना कसे भारी पडतात याचा प्रत्यय काल आला .स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला खबऱ्या मार्फत शिक्रापूर येथुन नगरला चंदनाची तस्करी करणारे वाहन जाणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकाने चाकण चौकात सापळा रचला दरम्यान पुणे-नगर रस्त्यावरून अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच-17 बिडी 26 98

हा नगरच्या दिशेने जात असल्याचे पोलिसांना दिसले पोलिसांनी टेम्पो थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र ड्रायव्हरने तसाच टेम्पो पुढे नेला मग पोलिसांनी पाठलाग करून टेम्पो अडवला या टेंपोची पाहणी केली असता त्यामध्ये टेम्पो मोकळा आढळला मात्र पोलिसांनी अजून बारकाईने तपास केला असता टेम्पोच्या मागच्या हौद्या मध्ये एक कप्पा तयार केला होता त्या कप्प्यामध्ये उघडून पाहिले असता पोत्यात भरलेले 190 किलो वजनाचे चंदनाची लाकडी आढळून आली याप्रकरणी पोलिसांनी सुरज कैलास उबाळे वय 24 रा. चांदा ता. नेवासा जि अहमदनगर यास ताब्यात घेतले व पुढील तपासासाठी शिक्रापूर पोलिसांच्या हवाली केले पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे फौजदार अमोल गोरे सहाय्यक फौजदार दत्तात्रय गिरमकर मंगेश थिगळे, अक्षय नवले, प्रसन्नजीत घाडगे यांनी ही कारवाई केली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram