इंदापूर

चंदन लागवडीला प्रोत्साहन देवून अगरबत्ती उद्योगाला चालना देणार : दत्तात्रय भरणे

चंदन उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णयाची दिली ग्वाही

चंदन लागवडीला प्रोत्साहन देवून अगरबत्ती उद्योगाला चालना देणार : दत्तात्रय भरणे

चंदन उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णयाची दिली ग्वाही

इंदापूर : प्रतिनिधी

चंदन लागवडीला प्रोत्साहन देवून अगरबत्ती उद्योगाला चालना देण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल चंदन उद्योजकांनी केलेल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येतील अशी ग्वाही वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.मंत्रालयातील दालनात राज्यातील चंदन उत्पादन वाढीला उत्तेजन देण्याबाबत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

यावेळी राज्यमंत्री भरणे म्हणाले की,राज्यात चंदनाची लागवड वाढून हा उद्योग वाढल्यास राज्याच्या महसूलात भर पडेल.चंदन उद्योगासाठी धोरणात्मक निर्णय घेवून जे उद्योजक या क्षेत्रात काम करण्यासाठी तयार आहेत त्यांना सहकार्य करण्यात येईल.शासन स्तरावरून देण्यात येणा-या विहित वेळेमध्ये परवानग्या देण्याबाबत सर्व यंत्रणांना सूचना करण्यात येतील.चंदन पावडर,तेल तसेच चंदन काड्या यांना मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आहे.त्यामुळे चंदन लागवडीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शासन सर्वोतोपरी मदत करेल.चंदनाची लागवड कोणीही करू शकतो त्यामुळे या उद्योगाच्या बळकटीकरणासाठी शासन नक्कीच प्रोत्साहन देईल.अगरबत्तीच्या व्यवसायात कशा प्रकारे चंदनाचा समावेश करता येईल याचेही वने विभागाने पहावे. जेणेकरून अगरबत्ती व्यवसायाला देखील गती मिळेल.

यावेळी चंद्रपूरचे वनसंरक्षक किशोर मानकर यांनी अगरबत्ती व्यवसायाची सद:स्थितीची माहिती सांगितली तसेच यावेळी चंदन उद्योजक वदीराज मदभावी आणि त्यांच्या टीमने चंदन उद्योगात महाराष्ट्राला असलेल्या संधी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील चंदनाच्या मागणी, चंदन उद्योजकांना शासनाकडून हवे असलेले सहकार्य याबाबतीत सविस्तर विषयाचे सादरीकरण बैठकीत केले.

या बैठकीला अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक व मुख्य महाव्यवस्थापक ( नियोजन) संजीव गौंड, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन व व्यवस्थापन) जीत सिंग, बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास राव,बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या संचालक श्रीमती अभरना,चंद्रपूरचे वनसंरक्षक किशोर मानकर, वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे, उद्योजक वदीराज मदभावी आणि त्यांची टीम उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram