इंदापूर

चढ्या दराने खत विक्री करणारे निमगांव केतकी येथील दुकान कृषी विभागाकडून सील ; परवाना रद्द करण्यासाठी वरिष्ठांना प्रस्ताव पाठवणार

इंदापूर तालुका कृृषि अधिकारी भाऊ रावसाहेब रूपनवर यांनी छापा टाकला

चढ्या दराने खत विक्री करणारे निमगांव केतकी येथील दुकान कृषी विभागाकडून सील ; परवाना रद्द करण्यासाठी वरिष्ठांना प्रस्ताव पाठवणार

इंदापूर तालुका कृृषि अधिकारी भाऊ रावसाहेब रूपनवर यांनी छापा टाकला

निलेश भोंग ;बारामती वार्तापत्र

चढ्या दराने शेतकऱ्यांना खत विक्री करुन शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या निमगाव केतकी येथील एका खत विक्रेत्यावर बुधवार दिनांक ३० जून रोजी इंदापूर कृषी विभागाने कारवाई केली आहे.संबधीत दुकान १२ लाख ५ हजार रूपयाच्या मुद्देमालासह संबधीत खत दुकान २१ दिवसासाठी सिल करण्यात आले असून सदर निविष्ठा चालकाचा परवाना रद्द करणेबाबत वरीष्ठांकडे आपण प्रस्ताव पाठवणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी भाऊ रावसाहेब रुपनवर यांनी सांगितले आहे.

याबाबत दैनिक पुण्यनगरी मधून दिनांक 23 जुलै रोजी बातमी प्रसिद्ध झाली होती या अनुषंगाने प्रविण एकनाथराव बारवकर रा.काटी, ता.इंदापूर यांनी कृषी विभागाकडे तक्रार केल्याने ती कारवाई करण्यात आली.

निमगांव केतकी येथील गजकुमार हीराचंद गांधी कृृृषि भंडार निमगाव केतकी या कृषी आस्थापना चालकाकडे खत साठा शिल्लक असताना आपल्याकडे मालाचा तुटवडा आहे असे सांगून चालक शेतकर्‍यांना वाढीव दराने खत विक्री करून शेतकर्‍यांची लूट करत असल्याची तक्रार तालुका कृृृृषि अधिकारी यांचेकडे दाखल झाली होती. त्यानुसार इंदापूर तालुका कृृषि अधिकारी भाऊ रावसाहेब रूपनवर यांनी छापा टाकला. दुकानातील सर्व मालासह ही आस्थापना सिल करण्यात आली आहे. सदर दुकानाचा परवाना ही रद्द करण्यासाठी प्रस्ताव सादर पाठवला जाणार आहे.

सदरचा आस्थापना चालक हे खताचा बेकायदेशिर व अवैधरित्या साठा करत असून तो चढ्या दराने खते विक्री करत आहेत. सदर चालकाने गोडावूनमध्ये ठेवलेल्या मालाची तपासणी करण्यात यावी व नियमापेक्षा अतिरिक्त खतसाठा जप्त करण्यात यावा. शिवाय सबंधित आस्थापना चालकावर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली होती.

छापा टाकला असता दुकानात मिळून आलेला अतिरिक्त खत साठा…
युरीया- ९९२ बॅग- किंमत २ लाख ६३ हजार, अमोनियम सल्फेट – १७४ बॅग no- किंमत १ लाख ४ हजार,१०:२६:२६ ४५५ बॅग – ५लाख ४६ हजार २०:२०:०:१३ – ९८०बॅग – २ लाख ३५ हजार, एस.एस.पी.३८० बॅग – ५७ हजार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!