पुणे

चर्चा तर होणारच! अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, कारण काय?

सत्तातरांच्या नाट्यानंतर पुन्हा एकदा पवार आणि फडणवीस पुण्यात एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत असल्यानं पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

चर्चा तर होणारच! अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर, कारण काय?

सत्तातरांच्या नाट्यानंतर पुन्हा एकदा पवार आणि फडणवीस पुण्यात एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत असल्यानं पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

पुणेःबारामती वार्तापत्र

सत्तातरांच्या नाट्यानंतर पुन्हा एकदा पवार आणि फडणवीस पुण्यात एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमाच्या निमित्त एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधीची राज्यात चांगलीच चर्चा रंगली होती. या शपथविधीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. मात्र, पवार आणि फडणवीस यांचे हे सरकार अडीच दिवसात कोसळलं. त्यानंतर अजित पवारांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, या घडामोडींना एक वर्ष पूर्ण झाले असले तरीही अजून विरोधकांकडून या मुद्द्यांवर टीका- टिप्पणी करताना दिसत आहे. या सर्व घडामोडींनंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

पुणे महापालिकेच्या भामा- आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाचे लोकार्पण १ जानेवारी रोजी होणार आहे. या प्रकल्पाचा ऑनलाइन लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसंच, या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. दरम्यान, भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करायचे, याचा कलगीतुरा महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये रंगला होता.

दरम्यान, या आधीही पुण्यात कोव्हिड सेंटरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र आले होते. या कार्यक्रमात दोघांनीही राजकीय फटकेबाजी केली होती. त्यामुळं आता पु्न्हा राजकीय टोलेबाजी रंगणार का? हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram