कोरोंना विशेष

चारच दिवसात पहिले कोव्हीड सेंटर फुल्ल.

दुसरे कोविड सेन्टर बारामती मध्ये सुरू.

चारच दिवसात पहिले कोव्हीड सेंटर फुल्ल.

दुसरे कोविड सेन्टर बारामती मध्ये सुरू.

बारामती:वार्तापत्र
एकीकडे कोरोनाचे संकट बारामतीवर अधिकच गडद होत असताना दुसरीकडे सामाजिक संस्था या संकटावर मात करण्यासाठी पुढाकार घेऊ लागल्या आहेत. शहरातील नाट्य क्षेत्रात कार्यरत नटराज नाट्य कला मंडळाने इंदापूर रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहात सुरु केलेले 100 खाटांच्या क्षमतेचे लोकसहभागातील पहिले कोविड केअर सेंटर चारच दिवसात भरून गेले. त्यामुळे नटराजने नव्याने दुसरे कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.


याबाबत नगरसेवक किरण गुजर यांनी माहिती दिली की, विद्या प्रतिष्ठानच्या पाठीमागील बाजूस असलेल्या तारांगण या महिला वसतिगृहात कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या वसतिगृहात देखील 100 खाटांची क्षमता करण्यात आली आहे.

लक्षणे नसलेले पण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. चौदा दिवस या रुग्णांवर येथे उपचार होतील व रुग्ण पुन्हा घरी जातील. शासकीय यंत्रणेला कोविड केअर सेंटर चालविण्यासाठी लोकसहभागातून मदत करणे, असा या मागचा उद्देश आहे. वैद्यकीय उपचार, तपासणी, रुग्ण दाखल करणे या बाबी आरोग्य विभागाच्या वतीने केल्या जाणार आहेत. जेवण, चहा, नाश्ता, करमणुकीची सोय व रुग्णांना इतर सुविधांचे नियोजन आहे.

वास्तविक दुसरे कोविड केअर सेंटर सुरू करावे लागणे, ही तशी चांगली बाब म्हणता येणार नाही, पण परिस्थिती गंभीर बनत असल्याने रुग्णांची चांगली सोय करण्याच्या उद्देशाने आम्ही प्रयत्न करीत आहोत. लवकरात लवकर यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न आरोग्य विभाग व प्रशासन करीत असून परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल.अशी आशा व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram