आपला जिल्हा

चार वर्षीय बालकाचा विहिरीत बुडून मृत्यू.

घातपात झाल्याचा संशय कुटुंबियांनी केला व्यक्त.

बारामती: तालुक्यातील माळेगाव येथे चार वर्षीय बालकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला असुन, बालकाच्या कुटुंबियांकडून घातपात झाल्याचा संशयव्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे माळेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत मृत बालकाच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रणवीर राहुल तावरे (वय-4) असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल अशोकराव तावरे ( वय ,37 रा. माळेगाव बुद्रुक, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. 9 जून रोजी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. या दिवशी रणवीर जेवण करून घरातच खेळत होता. काही वेळाने तो घरात व घराच्या आजुबाजूस आढळून न आल्याने घरातील लोकांनी रणवीरचा वस्तीत सर्वत्र शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. रात्री सव्वादहाच्या सुमारास घरापासून शंभर मीटर अंतरावर असणार्‍या विहिरीत बॅटरी लावून पाहिले असता रणवीर पाण्यात तरंगताना आढळून आला. त्यास पाण्याबाहेर काढून बारामती येथे उपचारासाठी नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी रणवीर हा 1 तासापूर्वी मयत झाल्याचे सांगितले. ऍड.तावरे यांच्या कुटुंबीयांसह नातेवाईकांनी या घटनेबाबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला असून चौकशी करण्याची मागणी केली आहे. घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे करीत आहे.

Related Articles

Back to top button