आपला जिल्हा

चिंकारा शिकार प्रकरणात आरोपीस अटक

फलटण तालुक्यात आरोपीस अटक

बारामती:वार्तापत्र जैनकवाडी मधील पवार वस्ती येथे चिंकारा हरीण शिकार प्रकरणातील आरोपी राजेंद्र शंकर आडके (राहणार कटफळ वय वर्ष 48 ) यास शुक्रवार 12 जून रोजी रात्री 8 च्या सुमारास वनविभाग च्या अधिकाऱ्यांनी फलटण तालुक्यातून ताब्यात घेतले आहे.”घटनास्थळी सदर आरोपी हजर होता चौकशी करून आणखीन त्याच्या बरोबर कोण कोण साथीदार होते आदी माहिती घेतली जाणार आहे व न्यायालयात हजर केले जाणार आहे” अशी माहिती बारामती चे प्रभारी वनक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली.

सदर आरोपीस फलटण तालुक्यातून ताब्यात घेतले असून या कामी श्री लक्ष्मी उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक एस पी कडू,वैभव भालेराव,बारामती चे वनपाल टी जी जराड, वनपाल अमोल पाचपुते,वनसंरक्षक सागर भोसले, श्रीमती कवीतके आदी नि अविरत तपास करून 4 दिवसात आरोपीस अटक केली आहे त्या मुळे प्राणीमित्र संघटना नि समाधान व्यक्त केले असून लवकरच आरोपी ना सजा झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

Related Articles

Back to top button