चिंकारा हरणाच्या पाडसाला जीवदान.
स्थानिकांनी वाचवले प्राण.
इंदापूर :-प्रतिनिधी
रुई थोरातवाडी (ता. इंदापूर) येथील वनीकरणामध्ये चुकलेल्या चिंकारा हरणाच्या पाडसाला स्थानिकांच्या साह्याने जीवदान मिळाले आहे. अधिक माहितीनुसार : या वन विभागाच्या गट क्रमांक सातमध्ये रुई गावातील कर्मवीर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष उदयसिंह आत्माराम पाटील, हरी पाटील व संतोष मारकड यांना हरणाचे पाडस आढळून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने वनपाल पूजा काटे यांना माहिती दिली. त्यानुसार वनकर्मचारी आप्पा देवकाते व दादा मारकड घटनास्थळी दाखल झाले. त्या पाडसाला परिसरात शोधत सैरावैरा धावणाऱ्या हरणीजवळ सोडण्यात आले. दरम्यान, पाडसाला जीवदान दिल्यामुळे या सर्वांचे इंदापूर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी कौतुक केले आहे.