चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या कारचा फोटो पाठवल्यास मिळणार 500 रुपये, काय आहे गडकरींचा प्लॅन
पार्क केलेल्या वाहनांना आळा घालण्यासाठी कायदा आणण्याचा विचार
चुकीच्या पद्धतीने पार्किंग केलेल्या कारचा फोटो पाठवल्यास मिळणार 500 रुपये, काय आहे गडकरींचा प्लॅन
पार्क केलेल्या वाहनांना आळा घालण्यासाठी कायदा आणण्याचा विचार
बारामती वार्तापत्र
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आपल्या कामाच्या शैलीमुळे ते नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या डोक्यातून येणाऱ्या भन्नाट योजना सरकार आणि जनतेला अशा लागू होतात की त्या मान्यच कराव्या लागतात दरम्यान केंद्रीय मंत्री गडकरी यांनी वाहतूक कोंडीच्या समस्येबाबत नवीन कल्पना मांडली आहे.
चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क असेल आणि तुम्ही तो फोटो पाठवला तर तुम्हाला सरकारकडून 500 रुपये मिळणार आहेत.
चुकीच्या ठिकाणी पार्क केलेल्या गाडीचा फोटो पाठवणाऱ्याला 500 रुपये देणार असा कायदा केंद्र सरकार आणणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल (दि.16) गुरुवारी दिली. गडकरी म्हणाले की, रस्त्यावर ठिकठिकाणी वाहने उभी असतात, त्यामुळे चालणे कठीण होते. विशेषतः दिल्लीत ही समस्या अधिक आहे.
‘कायदा आणणार’
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, मी असा कायदा आणणार आहे की रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनाला 1000 रुपये दंड आकारला जाईल. त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने वाहन पार्क करणाऱ्या गाडीचा फोटो काढून पाठवणाऱ्याला ५०० रुपये दिले जातील.
सौम्य शब्दात नितीन गडकरी म्हणाले, माझ्या नागपुरातील स्वयंपाकीकडेही दोन सेकंड हँड वाहने आहेत. आज चार जणांच्या कुटुंबाकडे सहा गाड्या आहेत. दिल्लीचे उदाहरण देताना ते म्हणाले की, दिल्लीचे लोक नशीबवान आहेत कारण त्यांच्या गाडीच्या पार्किंगसाठी आम्ही रस्ते मोठे बनवले आहेत.
यामुळे लोकांना रस्त्यावर गाडी पार्क करून जाण्याची सवय लागली आहे. यामुळे तेथील लोक आपल्या जागेत आपली वाहने पार्किंग करत नाही, प्रत्येकजण आपली गाडी रस्त्यावर पार्क करतो यामुळे वाहतुकीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे यासाठी सरकार नवीन कायदा करण्याच्या तयारीत आहे.