चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला बारामतीत शासकीय आरटीपीसीआर तपासणीसाठी स्वॅब घेतांना सतत चुका होताहेत का?
शासकीय यंत्रणेने सातत्याने होणाऱ्या या चुका टाळण्यासाठी गांभिर्याने उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे

चूक एकाची शिक्षा दुसऱ्याला बारामतीत शासकीय आरटीपीसीआर तपासणीसाठी स्वॅब घेतांना सतत चुका होताहेत का?
शासकीय यंत्रणेने सातत्याने होणाऱ्या या चुका टाळण्यासाठी गांभिर्याने उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे.
बारामती : वार्तापत्र
बारामतीतील शासकीय आरटीपीसीआर तपासणीसाठी घेतल्या जाणाऱ्या घशाच्या स्त्रावातील नमुन्यांची योग्यता गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चुकत आहे. कालही बारामतीत घेतल्या गेलेल्या २२ नमुन्यांचा निर्णय झालेला नाही. मध्यंतरी शासकीय आरोग्य यंत्रणेने हे स्वॅब कसे घ्यावेत याचे प्रशिक्षण दिले होते. मात्र त्यानंतरही या चुका होत असतील, तर या चुका आरोग्य खात्यासाठी नाही, तर त्या रुग्णांसाठी आणि ओघाने ते सर्वसामान्य जनतेसाठीही घातक ठरणार आहेत.
गेली काही दिवस सातत्याने स्वॅब घेण्यात चुका होत आहेत. काल नमुने घेतलेल्या संशयितांच्या २२ नमुन्यांना अनिर्णित ठेवण्यात आले आहे, त्यामुळे या लोकांना पुन्हा स्वॅब द्यावा लागणार आहे. मात्र जर यातील पॉझिटीव्ह रुग्ण असतील, तर अशांसाठी एक एक तासही महत्वाचा असताना त्यांना पुन्हा दोन दिवसांचा प्रतिक्षावधी लागणार आहे. या चुका टाळता येणारच नाहीत का?
शासकीय यंत्रणेने सातत्याने होणाऱ्या या चुका टाळण्यासाठी गांभिर्याने उपाययोजना करण्याची अत्यंत गरज आहे