क्राईम रिपोर्ट

चैन स्नॅचिंग गुन्हयातील अट्टल आंतरराज्य गुन्हेगार जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई  

दोन चोरीचे मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल असा किंमत रुपये ९०,०००/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला

चैन स्नॅचिंग गुन्हयातील अट्टल आंतरराज्य गुन्हेगार जेरबंद : पुणे ग्रामीण एलसीबी शाखेची कारवाई

दोन चोरीचे मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल असा किंमत रुपये ९०,०००/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला

क्राईम ; बारामती वार्तापत्र रिपोर्ट

दिनांक २४/०५/२०२१ रोजी यातील फिर्यादी पुरुषोत्तम प्रकाश बेहरा रा.शिरुर जि.पुणे हे पुणे-नगर रोडने जात असताना कोरेगाव भिमा ता.शिरूर येथे ग्रीन गार्डन हॉटेल जवळ आले असताना त्यांचे पाठीमागून एका अज्ञात इसमाने येवून फिर्यादीचे हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेला होता. सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरुन शिकापूर पोलीस स्टेशनला गु.र.नं. ३६०/२०२१ भादंवि क.३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले पथक करीत असताना त्यांना आज रोजी गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की, इसम नामे फिदा हुसेन मनुआली इराणी रा.पाटील इस्टेट, इराणी वस्ती, शिवाजीनगर पुणे हा कोणताही कामधंदा करत नसून त्याचेकडे असलेल्या करडे रंगाचे सुझुकी बर्गमॅन या मोटार सायकल नं. एमएच १२ एससी ३६८२ चा वापर करून रोडने जाणारे येणारे लोकांची लुटमार करतो. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे-नगर रोडने पेट्रोलिंग करीत असताना त्यांना सदर दुचाकी दिसलेने तिचा पाठलाग करुन कोरेगाव भिमा येथे आडवून त्यावरील इसम फिदा हुसेन मनुआली इराणी वय २३ वर्षे रा.पाटील इस्टेट, इराणी वस्ती, शिवाजीनगर पुणे यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचेकडे दोन चोरीचे मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल असा किंमत रुपये ९०,०००/- रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. सदरचे मोबाईलबाबत त्याचेकडे चौकशी केली असता विवो कंपनीचा मोबाईल कोरेगाव भिमा ग्रीन गार्डन हॉटेल जवळ एका इसमाकडून जबरदस्तीने हिसकावल्याचे सांगितले व ओपो कंपनीचा मोबाईल कोरेगाव भिमा जवळील गंधर्व गार्डन्स हॉटेल जवळ एका इसमास, ‘तू तुझे मोबाईलमध्ये मुलींचे फोटो का काढले? असे म्हणून त्याचा मोबाईल हिसकवल्याचे सांगितले आहे. आणखीन चौकशी केली असता त्याने कोरेगाव भिमा, शिक्रापूर व दौड परिसरातही अशा प्रकारचे आणखीन गुन्हे केल्याचे सागितले. त्याबाबत खात्री केली असता खालील प्रमाणे एकूण ५ गुन्हे दाखल असून ते उघडकीस आलेले आहेत.
१) फेब्रुवारी २०२१ मध्ये पाटस दौंड रोडवर, दौंड ता. दौंड जि.पुणे येथे मोटार सायकलवरील एका पुरुष व महिलेला हत्याराचा धाक दाखवून रोख रक्कम जबरदस्तीने चोरली असलेबाबत दौंड पोलीस स्टेशन गु.र.नं. ८७/२०२१ भादंवि क.३९२ प्रमाणे दाखल आहे.
२) मार्च २०२१ मध्ये कोरेगाव भिमा येथे गंधर्व हॉटेलचा पत्ता विचारण्याचा बहाणा करून रोख रक्कम जबरदस्तीने चोरली असलेबाबत शिक्रापुर पोलीस स्टेशन गु.र.नं २०३/२०२१ भादंवि क.३९२,३४ प्रमाणे दाखल आहे.
३) एप्रिल २०२१ मध्ये शिक्रापुर चाकण रोडवर रोडचे कडेला उभा असलेल्या इसमास हत्याराचा धाक दाखवून रोख रक्कम जबरदस्तीने चोरली असलेबाबत शिक्रापुर पोलीस स्टेशन गु.र.नं.२५२/२०२१ भादंवि क.३९२ प्रमाणे दाखल आहे.
४) मे २०२१ मध्ये कोरेगाव भिमा जवळील ग्रीन गार्डन हॉटेल जवळील एका इसमाचे दोन मोबाईल धक्का देवून जबरदस्तीने चोरले असलेबाबत शिक्रापुर पोलीस स्टेशन गु.र.नं.३९७ /२०२१ भादंवि क.३९२ प्रमाणे दाखल आहे.

५) मे २०२१ मध्ये कोरेगाव भिमा जवळील गंधर्व गार्डन्स हॉटेल जवळ एका इसमास मुलीचे फोटो का काढले ? असे बोलून त्याचेकडील एक मोबाईल जबरदस्तीने चोरी केला असलेबाबत शिक्रापुर पोलीस स्टेशन गु.र.नं. ३६०/२०२१ भादंवि क.३९२ प्रमाणे दाखल आहे.

सदर आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी पुणे शहर येथे १८, हैद्राबाद (तेलंगणा) येथे ११ व गोवा येथे २ असे चैन, मोबाईल स्नॅचिंगचे एकूण ३१ गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,सपोनि. सचिन काळे पोहवा. महेश गायकवाड,पोहवा. निलेश कदम,पोहवा. सुभाष राऊत,पोहवा. जनार्दन शेळके,पोना. राजू मोमी,पोना. अजित भुजबळ,पो.ना. गुरु गायकवाड,पोना. मंगेश थिगळे,पोना. गुरु जाधव,पोना. अक्षय नवले चा.पोहवा. काशिनाथ राजापुरे
यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram