वृक्ष लागवडीसाठी शाळकरी मुलांना मिळणार गुण, मुख्यमंत्र्यांशी झाली चर्चा – उपमुख्यमंत्री अजित पवार
सदर बैठकीत या इलेक्ट्रिक वाहनांसाठी ग्राहकांना कसे आकर्षित करता येईल

वृक्ष लागवडीसाठी शाळकरी मुलांना मिळणार गुण, मुख्यमंत्र्यांशी झाली चर्चा – उपमुख्यमंत्री अजित पवार
सदर बैठकीत या इलेक्ट्रिक वाहनांसाठी ग्राहकांना कसे आकर्षित करता येईल
बारामती वार्तापत्र
झाडाचे महत्व पटवून देण्यासाठी पूर्वी जसे खेळासाठी मार्क दिले जात होते. तसेच शाळकरी मुलांना झाडे लावून ती जगवण्यासाठी मार्क देण्यात यावे.यामुळे लहान मुलांबरोबरच पालकांकडूनही मोठ्या प्रमाणात झाडे लावली जातील. असा मानस असून याबाबत नुकतेच मुख्यमंत्र्यांची बोलणे झाले असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोलताना पवार म्हणाले की ,कोरोना संकट आल्यानंतर प्रत्येकालाच प्राणवायूचे महत्व कळू लागले आहे. माणसाला जगण्यासाठी ऑक्सिजनच प्रमाण कमी झाल्यानंतर ऑक्सिजन किती महत्त्वाचा असतो हे समजायला लागल आहे. आता याला एकमेव पर्याय म्हणजे आपल्या वातावरणाशी समरस होणारी झाडे लावली पाहिजेत. वड, पिंपळ, निंब, आंबा, चिंच अशी स्थानिक वातावरणात तग धरू शकणारी तसेच ज्या झाडांवर पशुपक्षी वावरतील. अशी झाडे लावली पाहिजेत.
दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी, चारचाकीसह मोठ्या वाहनांना प्रोत्साहन देत आहोत. यासंदर्भात मुंबईत नुकतीच बैठक पार पडली. सदर बैठकीत या इलेक्ट्रिक वाहनांसाठी ग्राहकांना कसे आकर्षित करता येईल. त्यांना कर सवलत कशी देता येईल. याबाबत चर्चा झाली. सध्या दुचाकी व काही प्रमाणात बसेस रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे वाहनांसाठी लागणाऱ्या इंधनाची मागणी कमी होणार आहे.तर विजेची मागणी वाढणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांमुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.






