स्थानिक

जगन्नाथ वणवे यांना भारत सरकारचा आदर्श सरपंच पुरस्कार

राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना प्रभावी पणे तळागाळात पोचवण्यासाठी कार्य

जगन्नाथ वणवे यांना भारत सरकारचा आदर्श सरपंच पुरस्कार

राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना प्रभावी पणे तळागाळात पोचवण्यासाठी कार्य

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुक्यातील वंजारवाडी ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच जगन्नाथ बबन वणवे यांना नवी दिल्ली येथे आदर्श सरपंच पुरस्कार (बुधवार २० ऑगस्ट) रोजी रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांच्या हस्ते देण्यात आला.

भारत सरकार डॉ बाबासाहेब आंबेडकर भारत भूषण राष्ट्रीय आदर्श सरपंच पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी राज्यसभा खासदार अनिल बोंडे,मुख्य सचिव डॉ मनीष गवई, युवा कल्याण समिती चे मनोज सिंग आदी मान्यवर उपस्तीत होते.

वंजारवाडी मध्ये रस्ता,वीज,पाणी,शिक्षण आदी नागरिकांना देताना राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजना प्रभावी पणे तळागाळात पोचवण्यासाठी कार्य करणे,महिला आर्थिक सक्षमीकरण साठी विशेष प्रयत्न आदी कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कार देण्यात आला आहे.

पुरस्कार मिळाल्याने जवाबदारी वाढली असून या नंतर मोठ्या प्रमाणात वंजारवाडी ग्रामपंचायत च्या माध्यमातून कार्य करू असे निवडीनंतर जगन्नाथ वणवे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button