जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियां ईडीचं समन्स

128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे

जगप्रसिद्ध पनामा पेपर्स प्रकरणात बच्चन कुटुंबियां ईडीचं समन्स

128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे

प्रतिनिधी

पनामा पेपर लीक प्रकरणी बच्चन कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याप्रकरणी बच्चन कुटुंबियांची सून बॉलिवूडची अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन  हिला ईडीनं (ED) समन्स बजावलं आहे. पनामा पेपर लीक प्रकरणी ईडीनं हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. एबीपी माझाला सुत्रांनी ही माहिती दिली.

पनामा पेपर लीक प्रकरणी ईडीचा तपास सुरु 

दरम्यान, पनामा पेपर लीक प्रकरणी बच्चन कुटुंबाचंही नाव समोर आलं होतं. तेव्हा ईडीनं याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंगचाही गुन्हा नोंदवला होता. अंमलबजावणी संचालनालयाचे एचआययू या प्रकरणाची चौकशी करत आहे.

काय आहे पनामा पेपर्स प्रकरण?

2016 मध्ये, ब्रिटेनमध्ये पनामाच्या लॉ फर्मचे 11.5 कोटी टॅक्स डॉक्युमेंट लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. भारताबद्दल बोलायचे झाले तर जवळपास 500 जणांची नावे समोर आली होती. त्यात बच्चन कुटुंबाच्या नावाचाही समावेश आहे.

एका रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांना 4 कंपन्यांचे संचालक बनवण्यात आले होते. यापैकी तीन बहामासमध्ये, तर एक व्हर्जिन आयलंडमध्ये होती. या 1993 मध्ये तयार करण्यात आल्या. या कंपन्यांचे भांडवल 5 हजार ते 50 हजार डॉलर्स दरम्यान होते, परंतु या कंपन्या त्या जहाजांचा व्यवसाय करत होत्या, ज्यांची किंमत कोट्यावधी होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button