जगाचा ताप वाढवणारी बातमी ,ओमिक्रॉनचा पहिला बळी ब्रिटनमध्ये, ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांची माहिती
या स्ट्रेनमुळे शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल कराव लागत आहे.
जगाचा ताप वाढवणारी बातमी ,ओमिक्रॉनचा पहिला बळी ब्रिटनमध्ये, ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉनसन यांची माहिती
या स्ट्रेनमुळे शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल कराव लागत आहे.
प्रतिनिधी
जगाचा ताप वाढवणारी बातमी आहे. ब्रिटनमध्ये ओमिक्रॉन व्हायरंटचा पहिला मृत्यू झाला आहे. स्वत: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ही माहिती दिली आहे. या स्ट्रेनमुळे शेकडो लोकांना रुग्णालयात दाखल कराव लागत आहे. 30 पेक्षा अधिक वयाच्या लोकांनी कोरोना व्हॅक्सीनचा बुस्टर डोस घ्यावा, असं आवाहन करतानाच ओमिक्रानकडे जराही दुर्लक्ष करू नका, असा सावधतेचा इशाराही बोरिस जॉन्सन यांनी दिला आहे.
वेस्ट लंडनच्या पॅडिंगटनमध्ये लसीकरणाच्या वेळी पंतप्रधान जॉन्सन यांनी ही माहिती दिली. ओमिक्रॉनचा संसर्ग होत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. ओमिक्रॉनमुळे एका रुग्णाचा मृत्यूही झाला आहे, असं जॉन्सन यांनी सांगितलं.
35 लाख लोकांना बुस्टर डोस देणार
ओमिक्रॉनचा संसर्ग वाढू लागल्याने ब्रिटनमध्येन नागरिकांना बुस्टर डोस दिला जात आहे. 30 वर्षावरी व्यक्तींना हे बुस्टर डोस दिले जात आहेत. देशात ओमिक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावत आहे. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यसाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे, अशी माहिती ब्रिटनच्या आरोग्य अधिकाऱ्याने सांगितलं. इंग्लंडच्या राष्ट्री आरोग्य सेवा विभागाच्या मते, देशात 30 ते 39 वयोगटातील 75 लाख लोक आहेत. त्यामध्ये 35 लाख लोकांना आजपासून बुस्टर डोस देण्यात येणार आहे.