साताऱ्यातील अपहरण आणि हत्ये प्रकरणी नवा ट्वीस्ट, धक्कादायक माहिती आली समोर
10 महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

साताऱ्यातील अपहरण आणि हत्ये प्रकरणी नवा ट्वीस्ट, धक्कादायक माहिती आली समोर
10 महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करून हत्या केल्याच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
सातारा, बारामती वार्तापत्र :
10 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृतदेह विहिरीत सापडल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आणि याच चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. साताऱ्यातील या घटनेनं एक नवीन वळण घेतलं आहे. हा संपूर्ण प्रकार एकतर्फी प्रेमातून केल्याचं समोर चौकशीदरम्यान समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली असून आता आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
ओंमच्या आईवर एका तरुणाचं एकतर्फी प्रेम होतं. मात्र ओंमची आई त्याला कोणताच प्रतिसाद देत नव्हती. भेटणं बोलणंही टाळत होती.
त्यामुळे रागातून या तरुणानं ओंमचं अपहरण केलं आणि दोन दिवसांनी त्याची हत्या केली. अशी प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणानं ओंमची हत्या केली असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आल्यानंतर पोलिसांनी या आरोपीच्या मुस्क्या आवळल्या आहेत. 10 महिन्यांच्या ओंमला अपहरण करण्याचा डाव त्याच्या आईवर प्रेम करणाऱ्या एका तरुणानं एकतर्फी प्रेमातून रचला होता. या प्रकरणी चौकशीनंतर पोलिसांनी प्रियकराला ताब्यात घेतलं आणि आरोपीनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
नेमकं काय घडलं होतं?
चिमुकल्याचं दुचाकीवरून जात असलेल्या जोडप्यानं अपहरण केलं होतं. या संदर्भात सातारा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. गुरुवारी सकाळी या चिमुकल्याचा मृतदेह भगत दाम्पत्याच्या घराजवळ असलेल्या विहिरीजवळ आढळून आल्यानं मात्र मोठी खळबळ उडाली. ओम आदिक भगत असं या चिमुकल्याचं नाव. भगत कुटुंबियांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीमध्ये या चिमुकल्याचा मृतदेह आढळला