आपला जिल्हा

जनतेच्या विश्वासाचा पाया, विकासाची नवी दिशा सुलोचना गायकवाड सज्ज जिल्हा परिषदेच्या रणांगणात! 

वालचंदनगर - बोरी गटातून जोरदार चर्चा 

जनतेच्या विश्वासाचा पाया, विकासाची नवी दिशा सुलोचना गायकवाड सज्ज जिल्हा परिषदेच्या रणांगणात! 

वालचंदनगर – बोरी गटातून जोरदार चर्चा

इंदापूर –

भरणेवाडीच्या विकासाचा चेहरा आणि जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या सुलोचना बाबा गायकवाड या आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी वालचंदनगर–बोरी गटातून आपली उमेदवारी निश्चित करण्याच्या तयारीत आहेत. ग्रामपंचायत सरपंच म्हणून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर आणि जनतेच्या प्रचंड पाठिंब्याच्या जोरावर त्या आता जिल्हास्तरावर विकासाची गंगा वाहवण्यास सज्ज आहेत.

मागील कार्यकाळात सुलोचना गायकवाड यांनी भरणेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राहून रस्ते, पाणीपुरवठा, घरकुल, गटार बांधकाम, तसेच सुवर्ण जयंती योजनेअंतर्गत शौचालय उभारणीसारखी मूलभूत कामं यशस्वीरीत्या पूर्ण केली. कोरोना काळातही त्यांनी धाडसाने आणि संवेदनशीलतेने लोकांच्या सेवेत आपले योगदान दिले. त्यामुळे त्या ‘काम करणारे नेतृत्व’ म्हणून ओळखल्या जातात.

त्यांना मंत्री दत्तात्रय भरणे आणि जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांचे मार्गदर्शन लाभत असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनातही त्यांचे स्थान दृढ झाले आहे. भरणेवाडीप्रमाणेच संपूर्ण वालचंदनगर–बोरी गटाचा विकास साधण्यासाठी त्या दृढनिश्चयी आहेत.

सुलोचना गायकवाड यांना जनतेचा प्रचंड विश्वास, पती बाबा गायकवाड यांचे कार्यकर्तृत्व आणि पक्ष नेतृत्वाचा पाठिंबा या तिन्ही बळांवर उभे असलेले हे नेतृत्व आगामी निवडणुकीत या गटात नवा राजकीय अध्याय लिहिण्यास तयार आहे.

महिलांच्या सबलीकरणाबाबत सुलोचना गायकवाड यांची दृष्टी स्पष्ट आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्वयं-सहायता गट, कौशल्य विकास आणि शैक्षणिक प्रबोधनावर त्यांनी नेहमी भर दिला आहे. ग्रामीण भागातील महिला आणि तरुणाई यांना एकत्र घेऊन विकास प्रक्रियेत सामील करण्याचा त्यांचा प्रयत्न कायम राहिला आहे. त्यामुळे त्या केवळ राजकारणी नसून समाजसेविका म्हणूनही जनतेच्या मनात घर करून आहेत.

जनतेच्या मनात स्थान मिळवलेली, विकासाचा ध्यास घेतलेली आणि निष्ठेने पक्षासाठी कार्यरत असलेली सुलोचना गायकवाड या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मजबूत चेहऱ्यांपैकी एक ठरत आहेत.

Back to top button