शैक्षणिक

जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात ‘१,४८,९११ अखंड सूर्यनमस्कार’ घालत जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा..!

४०१ सूर्यनमस्कार घातले

जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात ‘१,४८,९११ अखंड सूर्यनमस्कार’ घालत जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा..!

४०१ सूर्यनमस्कार घातले

बारामती वार्तापत्र 

बारामती येथील जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील बालभवन ते ९ वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी दि.३१ जानेवारी २०२६ रोजी (रथसप्तमी) जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सुमारे १,४८,९११  सूर्यनमस्कार घालून एक आगळा वेगळा विक्रम नोंदवला.

या दिवशी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सहभागी विद्यार्थ्यांपैकी ७४ विद्यार्थ्यांनी सूर्योदय (स. ७:१५) ते सूर्यास्त (सायं. ६:२९) प्रत्येकी १,४०१ सूर्यनमस्कार घातले याच बरोबर बालभवन विभागाने सहभाग नोंदवून सुमारे ८१९ सूर्यनमस्कार घातले तसेच प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून सुमारे ९,८६० सूर्यनमस्कार घातले.

त्याच बरोबर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, संचालक व पालक  या सर्वांनी सूर्यनमस्कार घालत जागतिक सूर्यनमस्कार दिनाचा आनंद घेतला तर विद्यालयाचे आचार्य मा. श्री. हनुमंत दुधाळ यांनी  ४०१ सूर्यनमस्कार घातले.

जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयामध्ये पंचकोशाच्या विकसनासाठी विद्यार्थ्यांचा दररोज सकाळी सूर्यनमस्कार, योगा व उपासना यांचा सराव घेतला जातो. यामुळे जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी अनेक सूर्यनमस्कार सहज घातले.

सदर कार्यक्रमाचे नियोजन क्रीडा शिक्षक श्री. सचिन नाळे, श्री. अजिंक्य साळी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तम पद्धतीने केले.

या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा. श्री. सतीश धोकटे, संचालक मा. श्री. धनंजय क्षीरसागर व सर्व संचालक मंडळ तसेच आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग यांनी केले.

Back to top button