जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा ..
सौ. मंजिरी उंडे यांनी ‘कणा’ या कवितेचे गायन करून कुसुमाग्रजांना अभिवादन केले.

जनहित प्रतिष्ठानच्या विद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा ...
सौ. मंजिरी उंडे यांनी ‘कणा’ या कवितेचे गायन करून कुसुमाग्रजांना अभिवादन केले.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात गुरुवार दि. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी मराठी पाठ्यपुस्तकातील कवितांचे गायन केले. प्राथमिक विभागाच्या शिक्षिका सौ. शर्मिला कसबे यांनी त्यांच्या मनोगतातून मराठी भाषेची महती व कुसुमाग्रज यांच्या बद्दल माहिती सांगितली.
तसेच सौ. मंजिरी उंडे यांनी ‘कणा’ या कवितेचे गायन करून कुसुमाग्रजांना अभिवादन केले. प्राथमिक विभागाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन शिक्षक श्री. निलेश भोंडवे यांनी केले.
विद्यालयाच्या गुरुकुल विभागात प्रमुख वक्ते म्हणून शिक्षक मा. श्री. अजित रेवडे यांनी आपल्या वक्तृत्वाने सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडले. या प्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत मांडले व कवितेचे गायन केले. गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, शिक्षिका राणी ताई झगडे, सौ. कांचन काकडे यांनीही पद्य गायन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. गुरुकुल विभागाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार विद्यार्थिनींनी केले.
मराठी राजभाषा दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे, सर्व संचालक व मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.