जनहित प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी वर्धनगडावर घेतला ट्रेकिंगसह पावसात भिजण्याचा आनंद…
“हर हर महादेव” “छत्रपती शिवाजी महाराज” की जय अशा घोषणा

जनहित प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांनी वर्धनगडावर घेतला ट्रेकिंगसह पावसात भिजण्याचा आनंद…
“हर हर महादेव” “छत्रपती शिवाजी महाराज” की जय अशा घोषणा
बारामती वार्तापत्र
शालेय जीवनात मित्र-मैत्रिणीसोबत सहलीला जाण्याचा आनंद काही निराळाच. उत्साह, मस्ती आणि आनंद या अविस्मरणीय क्षणाची पर्वणीच ठरते. अशाच प्रसंगाचा अनुभव शनिवार दि.२६ जुलै २०२५ रोजी विद्यार्थ्यांनी घेतला.
औचित्य होते जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालया तर्फे आयोजित केलेल्या पावसाळी सहलीचे या अंतर्गत इ. ५ वी ते इ. १०वी च्या विद्यार्थ्यांची सहल पुसेगाव, वर्धनगड, व नेरतलाव या ठिकाणी नेण्यात आली.
विद्यार्थ्यांना नेहमी वेगळे अनुभव घेता यावेत. भविष्यात कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नये. त्यासाठी सहलीच्या निमित्ताने त्यांना नवनवीन, ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक स्थळांची माहिती दिली गेली. बसमध्ये पद्य, अभंग यांच्या भेंड्या रंगल्या.
पुसेगाव येथील श्री सेवागिरी मंदिरात दर्शन घेऊन प्रवासकरत अखेर सर्व मुले वर्धनगडाच्या पायथ्याशी पोहचली. सर्व मुलांनी “हर हर महादेव” “छत्रपती शिवाजी महाराज” की जय अशा घोषणा देत गड चढायला सुरुवात केली मुले ही जणू शिवाजी महाराजांचे मावळेच वाटत होते.
प्रचंड वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचा अनुभव घेत हिरव्या निसर्गा सोबत आणि पावसात चिंब भिजत सर्व विद्यार्थ्यांनी वर्धनगडाला भेट दिली. स्वराज्यात सामील होण्याचं भाग्य लाभलेला वर्धनगडला पाहण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांना होतीच व या पावसाळी सहलीमुळे ती पूर्ण झाली.
या पावसाळी सहलीचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) प्रा.मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, आणि विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी कौतुक केले.