जनहित प्रतिष्ठान विद्यालयाचा चि. देवांश तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम
१४ वर्षे वयोगटामध्ये प्रथम क्रमांक

जनहित प्रतिष्ठान विद्यालयाचा चि. देवांश तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम
१४ वर्षे वयोगटामध्ये प्रथम क्रमांक
बारामती वार्तापत्र
बारामती येथील जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील चि. देवांश अमोल डुडू या विद्यार्थ्याने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १४ वर्षे वयोगटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला.
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा क्रीडा संकुल बारामती या ठिकाणी पार पडल्या या स्पर्धेत विद्यालयाकडून चि. देवांश अमोल डुडू, चि. रुद्र राहुल ढवळशंख, चि. विश्वराज सागर घाडगे, चि. सर्वेश राजेश दाते, चि. आरंभ अमित लोणकर व चि. राजवीर संदिप माळशिकारे या सहा खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
सर्व गटातील स्पर्धेसाठी बारामती तालुक्यातून सुमारे तीनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला यामध्ये विद्यालयातील चि. देवांश अमोल डुडू या खेळाडूने १४ वर्षे वयोगटातील बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला व त्याची हवेली या ठिकाणी होणाऱ्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल देवांश व त्याच्या पालकांचे आणि त्याला मार्गदर्शन करणारे विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. सचिन सुभाष नाळे (NIS कोच) यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) प्रा.मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, आणि विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनी केले.