जनहित प्रतिष्ठान विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड…
हा निवड चाचणीचा सात दिवसाचा कॅम्प वरवंड ता. दौंड या ठिकाणी पार पडला.

जनहित प्रतिष्ठान विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड…
हा निवड चाचणीचा सात दिवसाचा कॅम्प वरवंड ता. दौंड या ठिकाणी पार पडला.
बारामती वार्तापत्र
बारामती येथील जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या कु. पायल दादासो गावडे (इ. ७ वी) व कु. वैष्णवी रणजित रुपनवर (इ. ८ वी) या विद्यार्थिनींची दि. २३ ते २७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत मनमाड, नाशिक येथे होणाऱ्या किशोर / किशोरी गट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी नंदुरबार जिल्हयाच्या संघामध्ये निवड झाली आहे.
हा निवड चाचणीचा सात दिवसाचा कॅम्प वरवंड ता. दौंड या ठिकाणी पार पडला. यामधून या दोन खेळाडूंची निवड झाली आहे. या खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक, एन.आय.एस. कोच श्री. सचिन नाळे व शिक्षक श्री. अजिंक्य साळी यांचे मार्गदर्शन लाभले.
या विद्यार्थ्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, आणि विद्यालायातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.