शैक्षणिक

जनहित प्रतिष्ठान विद्यालयामध्ये सलग १९ वर्षे ९ ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

विविधविषयांवर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व सादर केले.

जनहित प्रतिष्ठान विद्यालयामध्ये सलग १९ वर्षे ९ ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

विविधविषयांवर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व सादर केले.

बारामती वार्तापत्र

दि. १२ ऑगस्ट २०२५ रोजी जनहित प्रतिष्ठान विद्यालयामध्ये आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धा ९ ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त विद्यालयामध्ये दरवर्षी आयोजित करण्यात येते. सदर स्पर्धेचे आयोजन दोन गटांमध्ये केले गेले. परीक्षक म्हणून मा. सौ. किशोरी ताई सातव (छोटा गट इ. ५ वी ते इ. ७ वी ) व मा. श्री. संजय सागडे सर (मोठा गट इ. ८ वी ते इ. १० वी ) यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मा.श्री. काशीनाथ देवधर (DRDO भारत सरकारचे माजी समूह संचालक) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला, मार्गदर्शन करते वेळी ‘हर काम देश के नाम’ हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवावा असा संदेश देत भारताच्या यशाची गौरवगाथा सांगितली.

छोट्या गटामध्ये प्रथम क्रमांक- कु. रुद्राणी स्वप्निल देवकाते, विदया प्रतिष्ठान सी.बी.एस.ई. स्कूल, बारामती, द्वितीय क्रमांक- कु. गार्गी गिरीष जोशी, विदया प्रतिष्ठान न्यू बालविकास मंदिर पिंपळी, तृतीय क्रमांक- चि. अनुराज ज्ञानेश्वर कुंभार, जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बारामती, यांनी मिळविला तसेच उत्तेजनार्थ बक्षीस- कु. जान्हवी संतोष वाघमोडे, शारदाबाई पवार विदयालय शिवनगर हिने मिळविला.

मोठ्या गटामध्ये प्रथम क्रमांक- चि स्वरीत पंकज अहिरे, अनेकांत इंग्लिश मेडियम स्कूल, बारामती, द्वितीय क्रमांक- चि. ऋग्वेद अरुण गोडसे, अनेकांत इंग्लिश मेडियम स्कूल, बारामती, तृतीय क्रमांक– कु. वैष्णवी लक्ष्मण कुंभार, आर.एन.अगरवाल टेक्निकल हायस्कूल बारामती, यांनी मिळविला तसेच उत्तेजनार्थ बक्षीस– कु. श्रेया विलास फडतरे, न्यू इंग्लिश स्कूल, मेखळी, हिने मिळवीला. विद्यालयाने दिलेल्या विविधविषयांवर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व सादर केले. तालुक्यातून व ग्रामीण भागातून अनेक शाळांनी उस्फुर्त सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेचे नियोजन स्पर्धा प्रमुख विद्यालयाचे शिक्षक श्री. अजितआर्य रेवडे, शिक्षिका सौ. राणीताई झगडे, सौ. पल्लवी ताई पोतदार, सौ. कांचन ताई काकडे  व अन्य सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी करून स्पर्धा यशस्वी केली.

संस्थेचे सचिव मा. श्री. सतिश गायकवाड सर यांचेतर्फे छोटा गट रोख पारितोषिक प्रथम क्रमांकासाठी ₹ ५००/- द्वितीय क्रमांकासाठी   ₹ ३००/- तृतीय क्रमांकासाठी ₹ २००/- तसेच संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. हृषीकेश घारे सर यांचेतर्फे मोठा गट रोख पारितोषिक प्रथम क्रमांकासाठी ₹ १०००/- द्वितीय क्रमांकासाठी ₹ ७००/- व तृतीय क्रमांकासाठी ₹ ५००/- तसेच विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून ट्रॉफी व प्रमाणपत्र व सर्व सहभागी विद्यार्थ्यांना विद्यालाकडून सहभाग प्रमाणपत्र बक्षीस स्वरुपात देण्यात आले.

या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) प्रा.मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे व सर्व संचालकगुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, आणि विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी कौतुक केले.

Related Articles

Back to top button