शैक्षणिक

जनहित प्रतिष्ठान विद्यालयात पालक प्रबोधन व विद्यार्थी प्रबोधन वर्ग संपन्न…

मोठ्या संख्येने पालक उपस्थित

जनहित प्रतिष्ठान विद्यालयात पालक प्रबोधन व विद्यार्थी प्रबोधन वर्ग संपन्न…

मोठ्या संख्येने पालक उपस्थित

बारामती वार्तापत्र 

मुलांच्या वाढीत सुजाण पालकत्व खूप महत्त्वाचे असते यालाच अनुसरून दिनांक २२ व २३ ऑगस्ट २०२५ रोजी जनहित प्रतिष्ठानच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात पालक प्रबोधन व विद्यार्थी प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यासाठी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून मा.सौ. शारदाताई मोतीलाल चोरडिया (मा.बालभवन प्रमुख,ज्ञानप्रबोधिनी,निगडी पुणे) या उपस्थित होत्या.

पालक प्रबोधनात त्यांनी चालू जीवनावर आधारित वेगवेगळी उदाहरणे देऊन पाल्याच्या जडणघडणीत पालकांची भूमिका किती महत्त्वाची असते? हे खूप छान पद्धतीने पालकांना पटवून दिले.

विद्यार्थी प्रबोधनात विद्यार्थांनी चांगल्या सवयी अंगीकारून त्याद्वारे व्यक्तिमत्वाचा विकास करून घ्यावा हे अरुणिमा सिन्हा यांच्या उदाहरणातून समजावून दिले.

यावेळी बारामतीतील प्रसिद्ध व्यावसायिक मा.श्री. प्रफुल्ल गादिया, विद्यालयाचे उपाध्यक्ष (प्राथमिक विभाग) मा.श्री.किरणशेठ शहा – वाडीकर, संचालक मा.श्री.सुहास शहा – वाडीकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अतुल कुटे,बालभवन प्रमुख श्री.निलेश भोंडवे, विद्यालयातील जेष्ठ शिक्षक श्री. अजित रेवडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विद्यालयाचे शिक्षक श्री.अजिंक्य साळी यांनी केले व आभार मुख्याध्यापक श्री.अतुल कुटे यांनी मानले.

या कार्यक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) प्रा.मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे व सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे, आणि विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांनी कौतुक केले.

Related Articles

Back to top button