जनहित प्रतिष्ठान विद्यालयातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक संपन्न…..
विसर्जन मिरवणूकीत ढोल-ताश्यांच्या गजरात जल्लोष

जनहित प्रतिष्ठान विद्यालयातील बाप्पाची विसर्जन मिरवणूक संपन्न…..
विसर्जन मिरवणूकीत ढोल-ताश्यांच्या गजरात जल्लोष
बारामती वार्तापत्र
बारामती येथील जनहित प्रतिष्ठान विद्यालयातील विदयार्थ्यांनी “गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” असा जयघोष करीत गणेश विसर्जन मिरवणूक संपन्न केली.
छोटा व मोठा गट आणि इ. १ ली ते इ. १० वी च्या विदयार्थ्यांनी विद्यालय ते संघवी पार्क पर्यंत गणपती स्तोत्राचे पठण करीत विसर्जन मिरवणूकीत सहभाग घेतला. जनहित प्रतिष्ठान वाद्य पथकाने विसर्जन मिरवणूकीत ढोल-ताश्यांच्या गजरात जल्लोष करीत तसेच भगवा झेंडा हाती घेऊन आकर्षक मिरवणूक काढली. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी झाली होती. भाविकांच्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला आणि गणपती बाप्पाच विसर्जन करण्यात आले. प्रसादाच्या स्वरुपात विदयार्थ्यांना लाह्या शेंगदाणे देण्यात आले.
गणेश विसर्जन मिरवणूकीमध्ये संस्थेचे उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) प्रा.मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव प्रा.मा.श्री. सतीश गायकवाड (सर), संचालक मा.श्री. रवींद्र शिराळकर, मा.श्री. सुहास शहा (वाडीकर), गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे, बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे आणि विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक सहभागी झाले होते.