जनहित प्रतिष्ठान संस्थेतील पाच खेळाडूंची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी व क्रीडा शिक्षक सचिन नाळे यांची प्रशिक्षक म्हणून निवड.
स्पर्धेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून कबड्डीचे संघ आलेले आहेत.

जनहित प्रतिष्ठान संस्थेतील पाच खेळाडूंची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी व क्रीडा शिक्षक सचिन नाळे यांची प्रशिक्षक म्हणून निवड.
स्पर्धेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून कबड्डीचे संघ आलेले आहेत.
बारामती वार्तापत्र
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आयोजित १८ वर्षे वयोगट राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दि. १४ ते १७ जून २०२५ या कालावधीत बालेवाडी या ठिकाणी सुरू आहेत. सदर स्पर्धेसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून कबड्डीचे संघ आलेले आहेत.
या स्पर्धेसाठी जनहित प्रतिष्ठान संस्थेतील ज्योतिर्मयी शिंदे (कॅप्टन), वैष्णवी साबळे, मधुरा कुंभार, सृष्टी गावडे, मानवी कुंभार या पाच खेळाडूंची नंदुरबार जिल्ह्यातून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. तसेच जनहित प्रतिष्ठान विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. सचिन नाळे सर यांची नंदुरबार जिल्ह्याच्या मुलींच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे.
या निवडीबद्दल विद्यालयाचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, कार्याध्यक्ष समन्वयक मा. श्री. किशोर शिवरकर, उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), उपाध्यक्ष (गुरुकुल) मा.श्री. हृषीकेश घारे (सर), सचिव मा.श्री. सतीश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतीश धोकटे, संचालक मा.श्री. धनंजय क्षीरसागर, सर्व संचालक, आचार्य हनुमंत दुधाळ, मुख्याध्यापक अतुल कुटे, बालभवन प्रमुख निलेश भोंडवे या सर्वांनी निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या . सचिन नाळे सरांचे अभिनंदन व कौतुक केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.