जनावरांची वाहतूक करणाऱ्या परप्रांतीयावर गुन्हा दाखल
तब्बल 8 लाख 90 हजार रुपये किमतीच्या जनावरे ताब्यात

जनावरांची वाहतूक करणाऱ्या परप्रांतीयावर गुन्हा दाखल
तब्बल 8 लाख 90 हजार रुपये किमतीच्या जनावरे ताब्यात
इंदापूर;प्रतिनिधि
विनापरवाना तब्बल 26 जनावरे एकाच गाडीत दाटीवाटीने भरून चारा पाण्याची सोय न करता, वाहतूक करणाऱ्या एका परप्रांतीयावर इंदापूर पोलीस ठाण्यात प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पांडाया व्यंकटया पोतुला (रा. हेमजीपूर, जि. मेहबुबनगर, तेलंगणा) असे आरोपीचे नाव आहे. इंदापूर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई गणेश मच्छिंद्र डेरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पांडाया पोतुला हा गुरुवारी (दि.24) जुलै रोजी पहाटे 3 वाजताच्या सुमारास टेम्पोमध्ये (टीएस 07 यूएच 2389) 26 लहान मोठ्या संकरित गाई घेऊन पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरच्या दिशेने निघाला होत.
त्यास देशपांडे हॉटेल जवळ ताब्यात घेत त्याच्या कडून वाहनासह तब्बल 8 लाख 90 हजार रुपये किमतीच्या जनावरे ताब्यात घेतली.