हॉटेल बाहेर गाडी पार्किंगच्या कारणावरून ‘राडा’ करणाऱ्यास अटक..
काठ्या-दगडांनी हल्ला करत गाडीच्या काच्या फोडल्या; बारामती पोलिसांकडून एक आरोपी अटकेत

हॉटेल बाहेर गाडी पार्किंगच्या कारणावरून ‘राडा’ करणाऱ्यास अटक..
काठ्या-दगडांनी हल्ला करत गाडीच्या काच्या फोडल्या; बारामती पोलिसांकडून एक आरोपी अटकेत
बारामती वार्तापत्र
भिगवण रोडवरील वृंदावन हॉटेल बाहेर पार्किंगच्या कारणावरून दोघांमध्ये झालेल्या वादातून काठ्या व दगडांनी हल्ला झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी तात्काळ धाव घेत कारवाई करत एकाला अटक केली आहे.
(दि.२९ नोव्हेंबर) रोजी सकाळी
मानस पाटील (रा. तानाई नगर, बारामती) हे त्यांच्या मित्रांसह उदय, कुश, साहिल, मनिष, चैतन्य, ओंकार आणि स्वयम हे हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. यावेळी पार्किंगवरून अनोळखी मुलांशी वाद झाला. त्यानंतर आरोपीदेखील हॉटेलमध्ये जेवण्यासाठी बसले; मात्र दरम्यान त्यांनी फोन करून ८-१० जणांना बाहेरून बोलावले. फिर्यादी पाटील जेवण करून बाहेर येताच आरोपींनी अचानक काठ्या, लोखंडी गज आणि दगडांद्वारे हल्ला चढवला. दगड फेकून गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. मानस पाटील आणि त्यांच्यासोबतच्या मित्रांना मारहाण करण्यात आली. फिर्यादीवर जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात दगड आणि गजाने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना या बातमीची खबर लागतात त्यांनी तात्काळ पावले उचलली.पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक दिपाली गायकवाड, तसेच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादींच्या जबाबासह हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. यात राम अनिल लोखंडे या आरोपीस अटक करण्यातआली आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती यादव यांनी दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, दिपाली गायकवाड पोलिस जवान जितेंद्र शिंदे, राजू बन्ने यांनी केली असून उपनिरीक्षक युवराज पाटील हे पुढील तपास करत आहेत.
एमआयडीसी परिसरात दहशत करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई केली जाईल. हॉटेल चालक-मालक, व्यावसायिक, नागरिक यांनी अशा गोष्टींची तात्काळ माहिती द्यावी.
– चंद्रशेखर यादव पोलीस निरीक्षक






