कासुर्डी येथे बालमावळ्यांनी एकत्र येऊन तयार केला किल्ला
किल्ला निर्मितीतून दिला पर्यावरण संवर्धन आणि एकतेचा संदेश

कासुर्डी येथे बालमावळ्यांनी एकत्र येऊन तयार केला किल्ला
किल्ला निर्मितीतून दिला पर्यावरण संवर्धन आणि एकतेचा संदेश
यवत: बारामती वार्तापत्र
हल्लीच्या काळात सणासुदीचे स्वरूप फार बदलत चालले आहे. माणसं दुरावत चालली आहे. लहान मुलं बंदिस्त वातावरणात जगत आहेत. आपण मानुया बदल काळाची गरज आहे आणि इंटरनेट, मोबाईल या आवश्यक गोष्टी आहेत पण त्याचा अतिरेक वाईट आहे. त्याचाच परिणाम सध्याच्या बालमनावर होत आहे. पण हे सावरण्याची गरज आहे. ग्रामीण भागात आजही संस्कृती जपली जाते. आणि त्यामुळे लहानपणी तेच संस्कार बालमनावर होतात.
अशाच पद्धतीने कासुर्डी गावांतील लहान मुलांनी आपापल्या घरी किल्ला न बनवता सर्वांनी एकत्र येऊन एकच किल्ला बनवला त्या किल्ल्याच्या माध्यमातून या लहान मुलांनी झाडे लावा झाडे जगवा यासारखे पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिले.
यामध्ये दिशा आखाडे, समर्थ आखाडे, सार्थक आरडे, प्रांजल आखाडे, प्रतिक्षा आखाडे, आयुष वीर, कुणाल आरडे, आरुष आखाडे, ईशा आखाडे या बालमावळ्यांनी एकत्र येऊन एकच किल्ला तयार करण्याचा निर्णय घेतला व त्यासाठी तयारी करून किल्ला साकार केला व एकतेचा संदेशही या किल्ल्याद्वारे जात आहे.
भारतीय संस्कृती, सण उत्सव माणसाला घडविण्याचे काम करते. त्यासाठी सर्वांनी आपले सण आपली संस्कृती आनंदाने एकत्रित येऊन जपली पाहिजे. याचा परिणाम बालमनावर होत असतो. त्यातुन संस्कारी युवापिढी घडत असते.