जयदीप तावरेंचा जामीन होताच समर्थकांनी फोडले फटाके, घातली दुधाने अंघोळ
परिसरातील महिलांसह ग्रामस्थांनी जयदीप यांना दुधाची आंघोळ घालून पुढील वाटचालीस शुभेच्छा
जयदीप तावरेंचा जामीन होताच समर्थकांनी फोडले फटाके, घातली दुधाने अंघोळ
परिसरातील महिलांसह ग्रामस्थांनी जयदीप यांना दुधाची आंघोळ घालून पुढील वाटचालीस शुभेच्छा
बारामती वार्तापत्र
माळेगावचे माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना रविराज तावरे गोळीबार प्रकरणात नुकताच मुक्तता न्यायालयाने जामीन मंजूर केला.त्यामुळे ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद व्यक्त करून जयदीप यांना दुधाने आंघोळ घातली. माळेगावचे माजी सरपंच जयदीप तावरे यांना पोलिसांनी रविराज तावरे गोळीबार प्रकरणात मोका अंतर्गत कारवाई करत अटक केली होती.
31 मे रोजी रविराज तावरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या पाच तासात चार आरोपींना अटक देखील केली होती. मात्र, राजकीय आकसापोटी जयदीप तावरे यांच्यासह माळेगाव परिसरातल्या अनेकांची नावे यामध्ये गोवण्यात आल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला होता.
त्यामुळे गावातील राजकारण ढवळून निघाले होते.जयदीप यांच्या अटकेच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी रोष व्यक्त करत गाव बंद देखील केले होते. करून निषेध सभा घेतली होती.यामध्ये राजकिय आकसापोटी जयदीप यांना गोळीबार प्रकरणात अडकवण्यात आले असल्याचे सांगून तसे निवेदन पोलिसांना दिले होते.
त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी करून कलम १६९ अंतर्गत जयदीप यांना क्लिनचीट दिली.नंतर न्यायालयाने जयदीप यांचा जामीन मंजूर केला.त्यामुळे ग्रामस्थांनी या निकालाचे स्वागत करून फटाके फोडून आनंद व्यक्त केला.तर परिसरातील महिलांसह ग्रामस्थांनी जयदीप यांना दुधाची आंघोळ घालून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.