जयश्री खबाले यांची जिजाऊ ब्रिगेड पुणे(पूर्व)च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड.
सामाजिक क्षेत्रातील काम पाहता निवड करण्यात आली..
जयश्री खबाले यांची जिजाऊ ब्रिगेड पुणे(पूर्व)च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड.
सामाजिक क्षेत्रातील काम पाहता निवड करण्यात आली..
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
सामाजिक कार्यकर्त्या जयश्री खबाले यांची जिजाऊ ब्रिगेड पुणे(पूर्व)च्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे पुणे (पूर्व)च्या जिल्हाअध्यक्षा प्रा.जयश्री गटकुळ यांनी जयश्री खबाले यांना नियुक्तीपत्र दिले आहे.सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीच्या निकषावर खबाले यांची निवड केली गेली आहे.
या पदाच्या माध्यमातून पिडीत,अन्यायग्रस्त महिलांना न्याय मिळवून द्यावा.प्रगल्भ,प्रभावी वक्तृत्व,हिम्मतवान,कणखर,लढवय्या,निर्भीड,अभ्यासू कर्तुत्ववान अशा नव्या पिढीतील युवती महिलांना शैक्षणिक सामाजिक उपक्रमामधून विधायक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे,अशी अपेक्षा निवडपत्रात व्यक्त करण्यात आली आहे.
खबाले यांनी लायन्स क्लब मध्ये वृक्षारोपण,अन्नदान,अनाथ आश्रमातील मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत.ग्रामीण भागातील महिलांविषयी सामाजिक कार्य केले आहे.विविध सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असल्यामुळे जयश्री खबाले यांच्या निवडीमुळे सामान्य महिला व जनतेमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.